IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटकअखेर २५७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला १० धावा करता आल्या. दरम्यान या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई इंडियन्स संघातील यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनवर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्धच्या सामन्यादरम्यान इशान किशनने आयपीएल आचारसंहितेचा भंग केला. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यासह त्याच्या मॅच फी वर १० टक्के दंड आकारला गेला आहे. इशानने आपली चूक मान्य केली आहे.