Lok Sabha Election 2024: आमदाराची मतदाराला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदाराच्या अशा कृत्यामुळे मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली आहे. यामुळे मतदान केंद्रावर तुफान राडा झाला आहे.
अधिक माहिती अशी: आंध्र प्रदेशमध्ये देखील आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. आंध्रप्रदेशचे आमदार शिवाकुमार हे मतदान करण्यासाठी आले होते. तेव्हा ते मतदानाच्या रांगेतुन पुढे जात असल्यामुळे एका मतदाराने त्यांना रांगेत उभं राहायला सांगितलं. तेव्हा संतापलेल्या आमदार शिवाकुमार यांनी मतदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. आमदार शिवाकुमार यांनी मतदाराला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे मतदारांमध्ये दहशतीचं वातावरण दिसून आलं आहे. आंध्रप्रदेशच्या गुंटूरमध्ये मतदान केंद्रावर तुफान राडा झाला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली आहे.