spot_img
अहमदनगरपैसे वाटपावरून पारनेरमध्ये गोंधळ! दोन्ही गटांने घेतली टोकाची भूमिका, पहा काय घडलं

पैसे वाटपावरून पारनेरमध्ये गोंधळ! दोन्ही गटांने घेतली टोकाची भूमिका, पहा काय घडलं

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्याचे मतदान सुरु असून यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मतदानाच्या दिवशी अहमदनगरमध्ये आता आरोपांच्या जोरदार फैरी सुरु झाल्या आहेत. बारामतीप्रमाणे अहमदनगर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या आदल्या रात्री पैशाचा पाऊस पडत असल्याचा आरोप नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यावर केला. तसेच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गावागावात पाकीट वाटत असल्याचा आरोप सुजय विखेंवर केला. यावर महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके आणि रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

पारनेरचे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे यामध्ये रस्त्यावरती पैसे पडलेले आहेत तर राहुल शिंदे गाडीच्या बाजूला उभा आहे. राहुल शिंदे यांच्यावर पैसे वाटप करण्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला. याबाबत बोलताना महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी म्हटले की, पारनेर मधील जो व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो एकाच बाजूचा असून खरा व्हिडिओ समोर येणे गरजेचे आहे.

पैसे कोणाचे आहेत हे सांगायची गरज नाही ः खा. विखे
पैसे गाडीत नव्हे तर गाडी बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे पैसे कोणाचे आहेत हे सांगायची गरज नाही. अहमदनगर जिल्ह्यातील गुंडागिरीचे राज्य पारनेर मधील जनताच उध्वस्त करणार आहे, अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

सुजय विखेंचा पवारांना टोला
नगरमधील पैसे वाटपावरून आमदार रोहित पवार यांनी विखे यांच्यावर गावागावात पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. त्यावर खा. विखे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. २०१९ मध्ये रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोच्या कर्मचार्‍यांना पैसे वाटप करताना पकडले आहे. त्यांच्यावर आजही गुन्हा दाखल असल्याचा टोला सुजय विखे पाटील यांनी रोहित पवार यांना लगावला आहे. आपण काय केलं ते पाहावे आणि नंतर दुसर्‍यावर टीका टिप्पणी करावी, असेही खासदार सुजय विखेंनी म्हटले आहे.

दोन्ही गटांकडून गुन्हा दाखल
पारनेरचे भाजप तालुकाध्यक्ष राहुल प्रकाशराव शिंदे यांना रविवारी रात्री वडझिरे परिसरामध्ये पैसे वाटप करताना ग्रामस्थांनी अडवले. त्यावरून तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अनिल दत्तात्रय गंधाक्ते यांनी फिर्यादीत म्हटले आहे की. राहुल शिंदे हे आपल्या कारमधून पैसे वाटप करत होते. त्यावेळेस मी त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी शिंदे यांनी लोक जमवून आपणाला मारहाण केली. साक्षीदार वर्षा पांडुरंग गंधाक्ते, पांडुरंग बबनराव गंधाक्ते हे सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या फिर्यादीवरून राहुल शिंदे, विजय औटी, सचिन वरा यांच्यासह २० ते २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल शिंदे यांनी देखील फिर्याद दिली असून आपण आळकुटी येथे जात असताना आपली कार अडवून अनिल गंधाक्ते व सोबतच्या चार-पाच जणांनी आपल्या गाडीची काच फोडली. गाडीतील कागदपत्रे खाली फेकली. तसेच आपल्या गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली, अशी तक्रार केली आहे. यावरून अनिल गंधाक्ते यांचे विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...