अहमदनगर । नगर सहयाद्री
राज्याचं लक्ष अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर आहे. याच पार्श्वभूमीवर आज नगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. शेकडो लोक घराबाहेर पडून मतदान केंद्रावर पोहोचत आहेत.
नगर आणि शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी आज १३ मे (सोमवारी) सकाळी सात ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी निवडणूक यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज झाले असून सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतदान केंद्रावर मतदारांनी लांबच-लाब रांगा लावल्या आहे. मतदान केंद्र क्रमांक 288 कुरकुंडी येथील एका नवरदेवांनी बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बाजावला.आहे.