spot_img
ब्रेकिंगशिंदे गटाचे उमेदवार जाहीर! शिर्डीमधून 'यांना' उमेदवारी तर 'ते' विद्यमान खासदार गॅसवर?

शिंदे गटाचे उमेदवार जाहीर! शिर्डीमधून ‘यांना’ उमेदवारी तर ‘ते’ विद्यमान खासदार गॅसवर?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
शिवसेना एकनाथ शिंदे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. आठ जागांवरच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत विद्यमान १३ खासदारांपैकी सात खासदारांना संधी देण्यात आली असून शिंदे गटाच्या पहिल्या यादीत डॉ. श्रीकांत शिंदे यांचा समावेश केला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शिंदे गटाने आपल्या आठ उमेदवारांची नावे जाहीर केली. या आठपैकी पाच लोकसभा मतदारसंघांत शिंदे यांची लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांशी होणार आहे. जून २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट प्रथमच निवडणुकीच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.

शिर्डी लोकसभेची जागा मात्र सदाशिव लोखंडे यांना मिळाली असून काही विद्यमान खासदार अजून गॅसवर आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये ठाण्याच्या जागेवर अद्याप रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे शिंदे गट ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार

दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे

कोल्हापूर: संजय मंडलिक

शिर्डी : सदाशिव लोखंडे

बुलढाणा प्रतापराव जाधव

हिंगोली : हेमंत पाटील

मावळ : श्रीरंग बारणे

रामटेक : राजू पारवे

हातकणंगले : धैर्यशील माने

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता माघार नाहीच; उलथापालथ करावीच लागेल! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केले महत्वाचे विधान; केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार...