spot_img
ब्रेकिंगनगरकरांसाठी 'पे अँड पार्क' मंजूर! किती लागणार शुल्क? पहा एका क्लिकवर..

नगरकरांसाठी ‘पे अँड पार्क’ मंजूर! किती लागणार शुल्क? पहा एका क्लिकवर..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
महापालिका प्रशासनाने शहरातील ३६ रस्ते व जागांवर ’पे अँड पार्क’ मंजूर करत त्यासाठी नाशिक येथील खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. मागील वर्षी महासभेत या पार्किंग धोरणाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार निविदा काढून खासगी संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आता शहरातील प्रमुख रस्त्यांवर व निश्चित केलेल्या खुल्या जागांवर पार्किंगसाठी शुल्क द्यावे लागणार आहे.

महापालिका प्रशासनाने पार्कीझ मोबेलिटी प्रा.लि. या खासगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करून नो पार्किंग झोन, नो हॉकर्स झोन, सम विषम सशुल्क पार्किंग, एकेरी वाहतूक, महापालिकेच्या मोकळ्या जागेत ’पे अँड पार्क’ आदींच्या नियोजनाचा प्रकल्प अहवाल तयार केला होता. अहवालाला महासभेत मंजुरी देण्यात आल्याबर निविदा प्रक्रिया होऊन खासगी संस्थेला पार्किंग शुल्क वसुलीचा ठेका देण्यात आला आहे. पाच वर्षांसाठी हा ठेका देण्यात आला असून, यातून महापालिकेला पाच वर्षात २१.७५ लाख रुपये रॉयल्टी मिळणार आहे.

शहरात कुठे-कुठे वाहनतळ मंजूर?
लक्ष्मी भाऊराव पाटील विद्यालय, बेलदार गल्ली, चाँद सुलताना विद्यालय समोरील रस्ता, गाडगीळ पटांगण, गांधी मैदान, मंगल गेट मटन मार्केट समोरील जागा, नेहरू मार्केट मोकळी जागा, वस्तू संग्राहलय, नोबल हॉस्पिटल लगतचा रस्ता, जुने सिव्हील हॉस्पिटल, लालटाकी रस्ता अप्पू हत्ती चौक ते स्वास्थ्य हॉस्पिटल ते झेडपी कार्टरलगत, पोलीस लाईनलगत, बालिकाश्रम रस्ता नीलक्रांती चौक ते नायरा पेट्रोल पंप, सातभाई मळा, सावेडी जॉगिंग ट्रॅक १, सावेडी जॉगिंग ट्रॅक २, मिसगर विद्यालयामागे, बाडिया पार्कमधील दक्षिणेकडील गेट जवळील जागा, एकविरा चौक ते पारिजात चौक रस्ता, इमारत कंपनी, अमरधाम पश्चिमेकडील कंपाउंड जवळील जागा, मानकर गल्ली, नीलक्रांती चौक ते चौपाटी कारंजा रस्ता, पांजरपोळ मोकळी जागा (मार्केटयार्ड चौक), पाईपलाईन रस्ता, पुणे बस स्थानकाजवळ, नेताजी सुभाषचंद्र चौक ते नवी पेठ शहर सहकारी बँकपर्यंत, कोठी रस्ता ते यश पलेस होटल, भिस्तबाग चौक ते टीव्ही सेंटर हडको चौकापर्यंत, प्रोफेसर चौक ते प्रेमदान हॉटेल चौक, नवीन कलेक्टर ऑफिस रस्ता, सेंट आण्णा चर्च रस्ता, बंगाल चौकी, चायना मार्केट, सहकार सभागृह रस्ता, सावित्रीबाई फुले संकुल (आकाशवाणी केंद्राशेजारी) या ठिकाणी सशुल्क वा हनतळ मंजूर केले आहेत.

पार्किंगसाठी किती लागणार शुल्क?
दुचाकीसाठी ५ रुपये, चारचाकीसाठी १० रुपये, टेम्पोसाठी २५ रुपये, मिनी बस ५० रुपये, अवजड १२० रुपये, खासगी बस (१५ मौटा लांब) १५० रुपये शुल्क निश्चित केले आहे. या व्यतिरिक्त जीएसटी द्यावा लागणार आहे.

नो हॉकर्स झोनमध्ये पार्किंग केल्यास भरावा लागणार दंड
नो पार्किंग व नो हॉकर्स झोनमध्ये पार्किंग केल्यास दुचाकी (टोविंग) ७४२ रूपये, दुचाकी (क्लपिंग) ५०० रूपये, चारचाकी (टोविंग) ९८४ रूपये, चारचाकी (क्लंपिंग) ७४२ रूपये असे शुल्क (जीएसटी अतिरिक) मंजूर करण्यात आले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट..! टँकरची संख्या १५० पार

अहमदनगर | नगर सह्याद्री उन्हाच्या चढत्या पार्‍याबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. जिल्ह्यात...

पदाधिकारी नॉट रिचेबल? पारनेरची सेनापती बापट पतसंस्था व्हेंटीलेटरवर!

ठेवीदारांच्या रांगा | हवालदिल ठेवीदारांची केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे तक्रार | पदाधिकारी नॉट रिचेबल पारनेर |...

अमेरिकेतही डॉ. दीपक यांच्या संशोधनाला सन्मानाचा ‘दीप’

अहमदनगर | नगर सह्याद्री अमेरिकेतील व इतर देशातील आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट संशोधन संस्था यांच्यावतीने श्वसन प्रणालीमध्ये...

…म्हणून नगरमध्ये विजय महायुतीचाच होणार! खासदर विखे पाटलांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

श्रीगोंदा | नगर सह्याद्री अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, दक्षिण मतदार संघाचे उमेदवार...