Maharashtra Crime: प्रेमविवाह करण्यासाठी आपल्या बहिणीला मदत केल्याच्या रागातून दोघा सरफिऱ्या भावंडानी तरुणाच्या डोक्यावर चार वेळा बोलेरो घालत काटा काढल्याचा भयंकर प्रकार महाराष्ट्रात घडला. पवन शिवराम लोढे (वय २४ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे अशी संशयित आरोपीची नावे आहे.
अधिक माहिती अशी:चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशी घटना संभाजीनगरातील शेंदूरवादा- सावखेडा महामार्गावर घडली. मृत पवन लोढेच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जावून विवाह केला होता.
बहिणीच्या लव्ह मॅरेजला पवनने मदत केल्याचा राग सरफिऱ्या भावंडाच्या डोक्यात टकटक करत होता. त्याचाच राग मनात धरून आरोपींनी मृत तरुणाच्या डोक्यावरून तब्बल चार वेळा बोलेरो घालत निर्घृण हत्या केली हत्येनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे मृत तरुणाचे पुढील आठवड्यात लग्न होते. घरात लग्नाची तयारी केली जात होती. ज्याच्या लग्नामुळे घरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते, त्याच्याच मृत्यूची बातमी आल्याने मृत तरुणाच्या कुटंबीयांनी टाहो फोडला आहे.