spot_img
ब्रेकिंग‘साकळाई’च्या हालचाली गतीमान, बुधवारचे आंदोलन स्थगित

‘साकळाई’च्या हालचाली गतीमान, बुधवारचे आंदोलन स्थगित

spot_img

सुनील चोभे | नगर सह्याद्री
साकळाई उपसा सिंचन योजनेचा आराखड्याला आठ दिवसांत अंतिम मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश देण्यात यावा, अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा साकळाई कृती समितीने दिला होता. याबाबतचे निवेदन कृती समितीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले होते.

परंतु, राज्य सरकारच्या पातळीवर साकळाई योजना मंजुरीसाठीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. तसेच योजनेसाठी लागणारे पाणी उपलब्धता पत्राचे नाहरकत प्रमाणपत्रासाठीचा प्रस्ताव नाशिक कार्यालयाकडे तत्काळ पाठविण्याची कार्यवाही चालू आहे. प्रस्तावास लवकरच मंजुरी देण्याची कार्यवाही चालू आहे. रस्तारोको आंदोलन स्थगित करुन प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केल्याने साकळाई कृती समितीने उद्याचे १४ फेब्रुवारीचे चिखली येथे आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, नारायण रोडे यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना दिली.

गेल्या २५-३० वर्षापासून साकळाई उपसा जलसिंचन योजनेचा संघर्ष चालू असून साकळाई योजनेचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. ७९४ कोटींचा आराखडा तयार झाला आहे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपादन मंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर योजनेला मंजुरी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करू असे आश्वासन दिले होते.

आठ दिवसात आराखड्याला मंजुरी देऊन निधी वर्ग करावा अन्यथा लोकशाही मार्गाने १४ फेब्रुवारीला चिखली (कोरेगाव, ता. श्रीगोंदा) येथे सकाळी साडेनऊला नगर रोडवर जुना टोलनायावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. तसेच रुईछत्तीसी येथे दि. १६ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ वाजता, नगर-सोलापूर रोड वर २५ फेब्रुवारीला दौंड-अहमदनगर रेल्वे लाईनवर सकाळी साडेनऊ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेेंडे, समाजसेवक भापकर गुरुजी, संतोष लगड, नारायण रोडे, रामदाम झेंडे, पुरुषोत्तम लगड, रोहिदास उदमले, सुदाम रोडे, बापूसाहेब गाडेकर, शिवराम लंके यांनी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दिला होता.

दरम्यान, प्रशासनाने योजनेसाठी लागणारे पाणी उपलब्धता पत्राचे नाहरकत प्रमाणपत्रासाठीचा प्रस्ताव नाशिक कार्यालयाकडे तत्काळ पाठविण्याची कार्यवाही चालू आहे. प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळेल. रस्तारोको आंदोलन स्थगित करुन प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केल्याने साकळाई कृती समितीने उद्याचे १४ फेब्रुवारीचे चिखली येथे आंदोलन स्थगित केले आहे. परंतु, येत्या काही दिवसांत साकळाईच्या आराखड्याला अंतिम मंजुरी न मिळाल्यास तीव्र आंदेालन करणार असल्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे साकळाई योजनेच्या आराखड्यास मंजुरी मिळते की नाही हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

खा. विखेंचा पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद
साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते हे पाठपुरावा करत आहेत. सोमवारी खा. विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत साकळाईच्या प्रशासकीय मान्यतेबाबत बैठक घेण्याची विनंती केली. यावर उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बैठक घेऊन साकळाईचे पुढील नियोजन करण्याचे आश्वासन दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मांडओहोळ’ने गाठला तळ! पाणी उपसा करणाऱ्यांनो सावधान, प्रशासनाने दिला ‘हा’ इशारा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यात गावागावात व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली असून...

महिला बचत गटांसाठी खासदार विखे पाटलांचे मोठे गिफ्ट; वाचा सविस्तर

पाथर्डी | नगर सह्याद्री महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

बैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई। नगर सहयाद्री प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष 'गोल्डमॅन' पंढरीशेठ फडके...

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...