spot_img
अहमदनगरAhmednagar Politics : गडाखांचे कौतुक, विरोधकांचा खरपूस समाचार ! उद्धव ठाकरेंची सोनईमध्ये...

Ahmednagar Politics : गडाखांचे कौतुक, विरोधकांचा खरपूस समाचार ! उद्धव ठाकरेंची सोनईमध्ये दणकेबाज सभा

spot_img

सोनई / नगर सहयाद्री : उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. आज ते अहमदनगर जिल्ह्यातील सोनई या ठिकाणी आले होते. सोनई या ठिकाणी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांची मोठी सभा झाली. त्यांचे भव्य स्वागत यावेळी करण्यात आले. तब्बल २० जेसीबी मधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. दरम्यान या सभेमध्ये त्यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. तसेच त्यांनी यावेळी आ.शंकराव गडाख यांचे कौतुक केले.

आ.गडाख यांचे केले कौतुक
सोनई मधील मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आ. शंकरराव गडाख व सर्व शिवसैनिकांचे कौतुक केले. ते म्हणाले, सोनईमधले सोन्यासारखे माझे मर्द मावळे आहेत, त्यांचे, त्यांच्या प्रामाणिकपणाचे मी काय वर्णन करू, ज्यांच्याकडे पक्ष नाही, चिन्ह देखील नाही तरीही तुम्ही आमच्यावर प्रेम करत आहात, हे पाहून मी नतमस्तक होतो.. आता सध्याला माझ्याकडे तुम्हाला द्यायला विश्वास आहे. गडाखांसारखे निष्ठावंत दुसरे नाहीत असे ते यावेळी म्हणाले.

विरोधकांवर टीका
अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्याशी जागा वाटपाबाबत बोलत होते. ते अचानक भाजपसोबत गेले, भाजप 400 पार बोलले आणि घाबरले आहेत. त्यांचे 40 देखील खासदार निवडून येणार नाहीत. अर्थसंकल्पानंतर श्वेत पत्रिका काढली. त्यात आदर्श घोटाळा आणि संजय चव्हाण यांचे नाव आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या क्लिप आहेत. आदर्शमधील डीलर असा उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. मला नाही अब्रू मी कशाला घाबरू, अशी भाजपची परिस्थिती आहे, जे घाबरतात ते भाकड पक्षात जातात, अशी कडाडून टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सोनई येथे ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

आरएसएसमध्ये चांगले माणसं
मी मागे इथे आलो होतो पाऊस पडत होता, त्याची काय मदत मिळाली. इथे शेतकऱ्यांना काही मिळत नाही. गद्दारांना खोके, राज्य सभा मिळते. शेतकऱ्यांना काय मिळाले? आरएसएसमध्ये चांगले माणसं आहेत, कुटंब सोडून बाहेर राहिले आणि त्यांच्या डोक्यावर असे भ्रष्ट आणि उपरे आणून बसवले आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला बचत गटांसाठी खासदार विखे पाटलांचे मोठे गिफ्ट; वाचा सविस्तर

पाथर्डी | नगर सह्याद्री महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

बैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई। नगर सहयाद्री प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष 'गोल्डमॅन' पंढरीशेठ फडके...

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...

Ahmednagar: पाणीपुरवठा विस्कळीत होणार? महावितरणाने दिला महापालिकेला ‘असा’ इशारा

अहमदनगर | नगर सह्याद्री महापालिकेकडे थकीत असलेल्या पाणी योजना व पथदिव्यांच्या विजेच्या थकीत बिलापोटी महावितरण...