spot_img
महाराष्ट्रAhmednagar News : १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला; मंत्री भुजबळांचा गौप्यस्फोट

Ahmednagar News : १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला; मंत्री भुजबळांचा गौप्यस्फोट

spot_img

मराठा आरक्षणास विरोध नाही, त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याचे एल्गार मेळाव्यात मागणी

सुनील चोभे / विजय गोबरे | नगर सह्याद्री
अहमदनगरधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत सरकारला घरचा आहेर दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ तारखेला आरक्षणाची घोषणा करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हात ठेऊन मराठ्यांना आरक्षण देण्याची शपथ घेतली व आज ती पूर्ण केली असे म्हटले. जर त्यांनी खरोखर आरक्षण दिल असेल तर मग मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला का बसतायेत? आरक्षण दिल असेल तर कोट्यवधी खर्चून सर्वेक्षण का सुरु केले आहे असा प्रतिप्रश्न केला.

मराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. वेगळे आरक्षण द्यावे. सर्व्हेक्षणात जात विचारून सगळी खोटी माहिती भरली जात असल्याचा घणाघात केला. सगेसोयर्‍यांच्या अध्यादेशावरूनही त्यांनी टीकास्त्र सोडले. आधीच कुणबी सर्टिफिकेट खोटी काढली जात आहेत. त्यात आता शपथपत्र करून सगेसोयर्‍यांना देखील खोटे सर्टिफिकेट देण्यात येतील अशी शंका त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, आपण एल्गार मेळाव्याच्या अगोदरच १६ नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट केला.

नगरमध्ये ओबीसी समाजाच्यावतीने एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर, शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अंबादास गारुडकर, विशाल वालकर, दौलतराव शितोळे, आंधळे महाराज, शंकरराव हिंगे यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, गावातील वातावरण खराब होत आहे. ओबीसींना गावागावात त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ज्याठिकाणी ओबीसीची घरे आहेत तेथे जाऊन त्रास दिला जात आहे, काही ठिकाणचे ओबीसी गाव सोडून जात आहेत. हा अन्याय सुरु आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी जातनिहाय गणना करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी, जेणे करून ओबीसी समाज किती आहे ते समजेल. ओबीसींच्या लोकसंख्येनुसार त्यांना त्यांचे हक्क मिळतील असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करणार्‍यांवरही शरसंधान साधले. ते म्हणाले, मला जे राजीनामा द्या असे जे सांगत आहेत, त्यांच्यासाठी मी सांगतो की, मी एल्गार मेळावा सुरु करण्याआधीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजीनामा काय मागता मी आधीच तो १६ नोव्हेंबरलाच देऊन मोकळा झालो आहे असे ते म्हणाले.

 मनोज जरांगे यांच्यावरही टीकास्त्र
मला मराठा समाजाच्या नेत्यांची, विचारवंतांची कीव येते, हा तुमचा नेता कसा? जो बजेटमधून आरक्षण देता येते का बघा असं म्हणतो, कुणी बोलायला तयार नाही. कुणाच्या मागे जाताय? गावागावात दरी पडतेय, आम्ही आमच्या हक्काची लढाई लढतोय. मराठा समाजाला त्यांचे वेगळे आरक्षण द्या आणि आमच्यातून नको असं बोलणं चूक आहे? ओबीसीतून आरक्षण घ्यायचे आणि मंडल आयोगालाच आव्हान देण्याची भाषा केली जाते. काय हुशार, दादागिरी करायची. तुम्ही सगळे एकत्रित राहा. एकावर अन्याय झाला तर सगळ्यांनी एकत्रित उभं राहिले पाहिजे असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

… तर छगन भुजबळच मुख्यमंत्री होतील : जानकर
ओबीसी समाज ७२ टक्के आहे. आपल्यामध्ये एक नेता ठेवणे गरजेचे आहे. एक नेता मानून त्याच्या आदेशाने आपण चालणे गरजेचेच आहे. आपण आपली भांडणे विसरून आता एक येऊ. आपला समाज जवळपास ७२ टक्के आहे. तिकडे मुलायमसिंह, लालू प्रसाद, मायावती या मुख्यमंत्री होतात आता आपल्याकडे छगन भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकतील. कारण आपली संख्या तेवढी मोठी आहे असे प्रतिपादन रासपचे महादेव जानकर यांनी केले. ओबीसी समाज जर एकत्र झाला तर तुम्ही मुख्यमंत्री व्हाल व सर्व प्रश्न तुम्ही सोडवाल अशी अशा त्यांनी मंत्री भुजबळांकडे व्यक्ती केली.

रोहित पवार हा जातीयवादी चेहरा : पडळकर
अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी अनेक मुद्यांना हात घालत घणाघात केला. त्यांनी यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाचा दाखला देत ज्याच्याकडे बुद्धी, बळ, चातुर्य आहे त्यांच्याकडे सत्ता स्थापन करण्याची ताकद असते असे म्हणाले. जर सत्तेचा माज असेल तर अशा सरकारला खाली खेचण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला आहे असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी रोहित पवार यांच्यावर घणाघात केला. आ. रोहित पवार हे जातीयवादी चेहरा असल्याचे ते म्हणाले. रोहित पवार यांच्या अंगात रक्त नव्हे तर जातीयवाद वाहत आहे. अशा जातीयवादी माणसाचं पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा. ते ओबीसींचे नसून जातीयवादी आहेत असा घणाघात त्यांनी केला. मनोज जरांगे यांनी मंडळ आयोगला चॅलेंज करणार आहे असे वक्तव्य केले होते. त्यावरही त्यांनी टीका केली. मंडळ आयोगाने जे आरक्षण दिले ती म्हसोबाची खीर आहे का कि आम्ही घेतली आणि घरी आणली, अगदी तावून सुलाखून प्रक्रिया होऊन नऊ न्यायाधीशांनी आम्हाला आरक्षण दिले आहे. ते कुणीही चॅलेंज करू शकणार नाही असे पडळकर म्हणाले. मराठा समाजाला कुणबी दाखले देणे व सगेसोयरे या शब्दावरून त्यांनी सरकारवरच निशाणा साधला. आपले हक्क मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावेत व मंत्री छगन भुजबळ यांना पाठिंबा द्यावा, आल्या हक्कांचे रक्षण करावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जातीपेक्षा पक्ष मोठा झाला का? मनोज जरांगे यांचा मराठा नेत्यांवर संताप

छत्रपती संभाजीनगर। नगर सह्याद्री- मराठा समाजाचे सर्वपक्षीय जे आमदार, मंत्री आहेत त्यांनी सगेसोयरे यांच्याबाबत अधिवेशनात...

दहा टक्के मराठा आरक्षणास हायकोर्टात आव्हान? ‘यांनी’ केली याचिका दाखल

मुंबई। नगर सहयाद्री- राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा...

ब्रेकिंग : नगर पुणे महामार्गावर अपघात!! खचाखच भरलेल्या बसमधले ‘इतके’ प्रवासी जखमी

सुपा / नगर सह्याद्री नगर पुणे महामार्गावर लक्झरी बस व ट्रकचा भिषण अपघात झाला असुन...

भाजपचं ठरलं? गांधीनगरमधून गृहमंत्री शहा तर पंतप्रधान ‘मोदी’ ‘या’ मतदार संघातून लढणार

2024 Lok Sabha Elections: आगमी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सूत्राच्या...