spot_img
अहमदनगरमेहेकरी विद्यालयास धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्ण

मेहेकरी विद्यालयास धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्ण

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री :  मेहेकरी (ता. नगर) येथील श्री सद्गुरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील जय सुधीर जावळे या खेळाडूने धनुर्विद्या खेळामध्ये राज्यस्तरावर सुवर्ण तर राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक पटकाविले. कबड्डी, खो-खो, मैदानी धनुर्विद्या अशा विविध खेळांमध्ये सद्‌गुरू विद्यालयाचा सहभाग असतो. विद्यालयाचा कबड्डी संघ तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यामध्ये उपविजेता ठरला.
   यामधून दोन खेळाडूंची राज्य विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. जय जावळे या खेळाडूने राज्यस्तरावर धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्ण पदक व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळविले आहे.  खेळाडूंचे जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष रा. ह. दरे, सचिव जे. डी. खानदेशे, सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे, सर्व विश्वस्त, सदस्य, प्राचार्य व्ही. एच. गोबरे, विद्यालयातील सर्व सेवकवृंद, सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले. यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक बी. एम. पवार, आर. बी. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मांडओहोळ’ने गाठला तळ! पाणी उपसा करणाऱ्यांनो सावधान, प्रशासनाने दिला ‘हा’ इशारा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यात गावागावात व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली असून...

महिला बचत गटांसाठी खासदार विखे पाटलांचे मोठे गिफ्ट; वाचा सविस्तर

पाथर्डी | नगर सह्याद्री महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

बैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई। नगर सहयाद्री प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष 'गोल्डमॅन' पंढरीशेठ फडके...

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...