spot_img
ब्रेकिंग'शिर्डीत लक्झरी लूट प्रकरण' नऊ वर्षानंतर आरोपी 'असा' अडकला जाळ्यात

‘शिर्डीत लक्झरी लूट प्रकरण’ नऊ वर्षानंतर आरोपी ‘असा’ अडकला जाळ्यात

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
नगरमधून गुजरातकडे जाणार्‍या
लक्झरी बसमधील प्रवाशाला शिर्डीमध्ये लुटण्याचा प्रकार २०१५ मध्ये घडला होता. या प्रकरणातील मच्छिंद्र पोपट कांडेकर (रा. केडगांव) हा नऊ वर्षांपासून फरार होता. त्याला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

अधिक माहिती अशी : २८ एप्रिल २०१५ रोजी घटनेतील फिर्यादी रमेशभाई भाईचंद पटेल ( हल्ली रा. सावंत चेंबर्स, ख्रिस्तगल्ली) हे अहमदनगर येहून लक्झरी बसने सुरत, गुजरात येथे निघाले होते. जाताना शिर्डी येथील खंडोबा मंदिरासमोर दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी व साक्षीदार यांना पोलीस असल्याची बतावणी केली. तुम्ही चोरी करुन आले असून पोलीस स्टेशनला चला असे सांगत लझरी बसमधून खाली उतरून तवेरा गाडीत बसवले व त्यांच्या जवळील पाच लाख रुपये रोख रक्कम काढून घेतले.

त्यानंतर फिर्यादीस कोपरगाव येथे सोडून देत त्यांनी पळ काढला होता. तत्कालीन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास करुन राजेंद्र मोहन फडतरे, विकास पोपट झरेकर, मनोज दत्तात्रय शिंदे, सचिन प्रकाश राजगुरु (सर्व रा. केडगाव), पंकज तान्हाजी गडाख (रा. टाकळी काझी, ता. नगर), नितीन पटेल यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला होता.

यातील मच्छिंद्र पोपट कांडेकर हा अद्यापपर्यंत फरार होता. दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार आहेर यांनी सफौ/राजेंद्र वाघ, रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, देवेंद्र शेलार, मयुर गायकवाड व उमाकांत गावडे आदींचे पथक नेमून कारवाई सुरु केली.

वरील आरोपीचा शोध घेत असताना तो गोंदीया, नागपूर व झारखंड या ठिकाणी त्याचे नाव बदलून राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. हा आरोपी २८ मार्च २४ रोजी कात्रड, वांबोरी, ता. राहुरी येथे त्याचे नातेवाईकांकडे येणार आहे. अशी गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली. पथकाने लागलीच तेथे जात पोलिसानी छापा टाकत त्यास ताब्यात घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य जरा गडबड करणार! ‘या’ राशीच्या लोकांनी सांभाळून रहा…

मुंबई । नगर सहयाद्री- मेष राशी भविष्य आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे...

Ahmednagar News पोलिसांची घरेच सुरक्षित नाहीत तर नागरिकांच्या सुरक्षेचे काय? चोर्‍यांच्या प्रश्नावरून काळेंचा संतप्त सवाल

अहमदनगर | नगर सह्याद्री मागील काही दिवसांपासून नगर शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे....

Ahmednagar Crime: नगरमध्ये चाललंय काय? टोळक्याची महिलांना घरात घुसून मारहाण, कुठे घडला प्रकार..

अहमदनगर | नगर सह्याद्री १२ ते १३ जणांच्या टोळयाने घरात घुसून दोन महिलांना मारहाण करून...

मराठा समाज आक्रमक! आंदोलकांनी रस्त्यावर उतरत जाळले टायर

धाराशिव | नगर सह्याद्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्ध धाराशिव...