spot_img
अहमदनगरराहुरीकरांच्या ‘त्या’ प्रश्नासाठी माजी खासदार तनपुरेंनी ठेकेदाराला घेरले

राहुरीकरांच्या ‘त्या’ प्रश्नासाठी माजी खासदार तनपुरेंनी ठेकेदाराला घेरले

spot_img

राहुरी। नगर सहयाद्री
राहुरी शहराचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून विस्कळीत आहे. नवीन पाईपलाईनच्या कामामुळे दिवसाआड पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी होत आहे. राहुरी शहराच्या विस्कळीत पाणी पुरवठ्यावरून भाजप पदाधिकार्‍यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरेंना घेराव घातला, तर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नगरपालिका कार्यालयात जात पाईपलाईनचे काम करणार्‍या ठेकेदाराची कानउघडणी केली. दोन दिवसांत पाईपलाईनचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदाराने यावेळी दिले.

राहुरी शहराचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून विस्कळीत आहे. नवीन पाईपलाईनच्या कामामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी भाजप शहरातील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना घेराव घालत जाब विचारला. भाजपचे शहराध्यक्ष भैय्या शेळके, प्रकाश पारख यांच्या नेतृत्वाखाली गेलेले शिष्टमंडळ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात चांगलेच आक्रमक झाले.

राहुरी नगरपालिकेच्या मुळानगर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. नवीन काम चालू असल्याने राहुरी शहराला एक महिन्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. प्रत्यक्षात काम पंधरा दिवसात पूर्ण होईल. पण महिनाभर एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊनही कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा तातडीने सुरळीत व्हावा, यासाठी आंदोलन करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर, कारण काय? पहा..

बीड । नगर सहयाद्री- भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि मराठा आंदोलन जरांगे पाटील हे...

नगरच्या वीज चोरांना ‘जोरका झटका’! एक चूक नडली, दंडाची कारवाई भवली? वाचा सविस्तर..

भरारी पथकांनी कोट्यवधीची वीज चोरी पकडली अहमदनगर। नगर सहयाद्री वीजचोरी व अनधिकृत वीज वापराविरोधात महावितरण गंभीर...

‘आयोध्येतील एैतिहासिक श्रीराम मंदिराच्या निर्मितीमुळे कोट्यावधी हिंदूच्या अपेक्षा पूर्ण’

राहुरी| नगर सहयाद्री  विकासाला प्राधान्य देतानाच, संस्कृती परंपरेचा वारसा जतन करण्याचे महत्वपूर्ण काम विश्वनेते पंतप्रधान...

Health Tips: रखरखत्या उन्हाळ्यात ‘या’ गोष्टी करतील रक्षण? आरोग्याच्या काळजीसाठी एकदा पहाच..

नगर सहयाद्री वेब टीम- राज्यात रखरखत्या उन्हाळ्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. उन्हाळ्यामधे उष्णतेपासून वाचण्यासाठी आणि...