spot_img
देशभाजपा रणनीती आखणार? लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ७० नेत्यांची बैठक

भाजपा रणनीती आखणार? लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ७० नेत्यांची बैठक

spot_img

पुणे। नगर सहयाद्री
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख ७० भाजप नेत्यांची बैठक रविवारी (दि. ७) पुण्यात होत आहे. यामध्ये भाजपकडून लढविल्या जाणार्‍या संभाव्य २३ ते २५ जागांवर मंथन होणार असल्याची चर्चा आहे.

भाजपकडून पुण्यातील बैठक संघटनात्मक पातळीवरील असल्याचे सांगण्यात येत असले, तरी यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीवर सविस्तर चर्चा झडेल, असा दावा उच्चपदस्थ सूत्रांकडून करण्यात आला आहे. राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून, भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सत्तेत आहे. राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी भाजपकडून २३ ते २५ जागा लढविल्या जाण्याची शयता आहे.

त्यात पश्चिम महाराष्ट्रातील किमान सात जागांचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये लोकसभेच्या दहा जागा आहेत. त्यामध्ये कोल्हापूर किंवा हातकणंगलेपैकी एक जागा भाजपला मिळेल. सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील चारही जागा भाजप लढवेल, असे चित्र आहे. याशिवाय पुण्यातील पुणे आणि बारामती भाजपकडे, तर शिरूर आणि मावळ अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना लढविण्याची शयता आहे. या सर्व जागांवरील संभाव्य उमेदवारांसह येथील निवडणूक तयारीचा आढावा बैठकीत घेतला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांपैकी एक जागा भाजपकडे, दुसरी जागा शिवसेनेकडे आहे. नगरमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे खासदार आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्याची जबाबदारी विखे पाटील यांच्यावर असणार असून, या ठिकाणच्या दोन्ही जागांबाबत सविस्तर चर्चा अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली नाही आणि ही जागा वर्षभरापासून रिक्त आहे.

उच्च न्यायालयाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला चपराकही लगावली आहे. पुण्यात भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजपचे नेते सुनील देवधर, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी खासदार संजय काकडे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याही नावांची चर्चा आहे. याशिवाय ऐनवेळी आमदार माधुरी मिसाळ यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. बापट यांच्या कुटुंबाचा विचार झाला, तर गौरव बापट यांच्या नावाचाही विचार होऊ शकेल. मोहोळ, मुळीक आणि देवधर यांच्याकडून जनसंपर्क वाढविण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...