spot_img
अहमदनगरअहमदनगर दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवण्याचा करंटेपणा कुणाचा ? आ. लंकेंचा 'हा' गंभीर...

अहमदनगर दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवण्याचा करंटेपणा कुणाचा ? आ. लंकेंचा ‘हा’ गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र, वाचा..

spot_img

शरद झावरे । नगर सहयाद्री-

अपुऱ्या पावसामुळे नगर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्यासाठी सर्व निकषांमध्ये बसत आहे. परंतु सबंधित कंपनीच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे जिल्हा दुष्काळी उपाययोजनांपासून वंचित राहिला असल्याचा आरोप आमदार नीलेश लंके यांनी केला आहे. नगर जिल्हा दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवण्याचा करंटेपणा कोणाचा यांची चौकशी करण्याची मागणी आ. नीलेश लंके यांनी केली आहे.

नगर जिल्ह्यातील एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला नसल्याने आ. नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून वस्तुस्थतीकडे लक्ष वेधले आहे. आ. लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे की, नगर जिल्हयाच्या विशेषतः दक्षिण भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला असून पारनेर तालुक्यात महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार ११३.२३ मि मि पावसाची नोंद झालेली आहे. अकोले १०२.६१, जामखेड ८९.८, कर्जत ८५.३४, नगर १०९.८३, पाथर्डी १०२.३१, राहुरी ६३.३३, शेवगांव ९८.६४ तर श्रीगोंदे तालुक्यात ११०.४२ मि मि पाऊस झालेला आहे.

नगर दक्षिणेचा बहुंतांश भाग हा दुष्काळी असून पावसाचे सर्वेक्षण करणाऱ्या खाजगी कंपनीने दुष्काळ जाहिर करण्यापूर्वी पावसाची टक्केवारी, वनस्पतींचे आवरण, ओलावा, तसेच सॅटेलाईटद्वारे प्रत्यक्ष पाहणी न करताच अहवाल सादर केल्याने जिल्हयावर अन्याय झाला आहे. दक्षिणेतील सर्व बंधारे, पाझर तलाव, कोल्हापुर पध्दतीचे बंधारे कोरडे असून पारनेर तालुक्यातील मांडओहळ, काळू, भांडगाव या प्रकल्पातही पाणी नसल्याचे आ. लंके यांचे म्हणणे आहे.

पावसाअभावी शेतकर्यांच्या खरीपाबरोबर रब्बीच्याही पेरण्याही झाल्या नसून थोडयाफार पावसावर ज्या शेतक-यांनी पेरण्या केल्या त्यांची खते, बीयाणे वाया गेली आहेत. टंचाई आराखडयात पारनेर तालुक्यातील ७० गावांचा समावेश असताना दुसरीकडे दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पारनेरचा समावेश नाही हा विरोधाभास असल्याचे आ. लंके यांनी निदर्शनास आणून दिले. पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल अशी आजची परिस्थिती आहे. ज्यावेळी टॅाकर सुरू होतील, त्यावेळी टँकर भरायचे कुठून हा प्रश्‍न निर्माण होणार असल्याचे म्हटले आहे.

शासकीय आकडेवारीत तफावत

जिल्हयाच्या दक्षिण भागात जुन ते सप्टेबर या कालावधीमधील पर्जन्याची तुट, उपलब्ध असलेल्या भुजलाची कमतरता, दुरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करण्यात आला नसून प्रत्यक्ष स्थिती व कागदोपत्री आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याने मदत आणि पुनर्वसन मंत्रयांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीने यासंदर्भात लवकर निर्णय घेण्याची मागणी आ. लंके यांनी केली आहे.

नगर जिल्ह्यावर अन्याय

दिवाळीनंतर बहुतांश गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार असून ज्वारी, वाटाणा, कांदा, सोयाबिन, बाजरी व इतर पिंकांचे होणारे नुकसान हे ७५ ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त असणार आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने घोषित केलेल्या ट्रिगर १ व ट्रिगर २ या उपाययोजनांमधील निकषात बसत असतानाही प्रशासनाच्या हालगर्जीपणामुळे व दुर्लक्षामुळे नगर जिल्हयावर अन्याय होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...