spot_img
अहमदनगरनगरमध्ये चाललंय काय? आमच्या भाईला मारतो का, तु मागच्या वेळेस वाचला आता....;...

नगरमध्ये चाललंय काय? आमच्या भाईला मारतो का, तु मागच्या वेळेस वाचला आता….; भररत्यात युवकावर सपासप वार!

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
अहमदनगर शहरात भर रस्त्यात युवकावर धारदार शस्राने सपासप वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जखमी युवक अजय शिवाजी कर्पे (वय २४ रा. सावेडी) यांच्यावर जिल्हा शासकीय रूणालयात उपचार सुरू असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयुर बाळासाहेब सोमवंशी (पद्मानगर, पाईपलाईन रस्ता, सावेडी), ओमकार ठोंबरे, अभी तिरंदास (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी), ताहीर मुन्ना शेख (रा. हिंदुत्व चौक, तपोवन रस्ता, सावेडी), जयदीप मते (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पद्‌द्मानगर, पाईपलाईन रस्ता, सावेडी), विकास उर्फ विकी ढवण (पूर्ण नाव माहिती नाही, रा. वाणीनगर, तागड वस्ती, सावेडी), सोमनाथ गुंजाळ (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्ची नावे आहे.

शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास सदर प्रकार घडला. अजय कर्पे मित्र वैभव संपत बारस्कर यांच्या लोकसेवा टी सेंटर येथे चहा पिण्यासाठी बसलेले होते. तेथे अचानक दुचाकीवरून मयुर सोमवंशी व इतर पाच ते सहा जण आले. ओमकार ठोंबरे व अभी तिरंदास रागाने म्हणाले, ‘आज्या आमच्या भाईला मारतो का, तु मागच्या वेळेस वाचला आता याला जिवंत सोडू नका कुठे आहे त्याचा मित्र त्याला पण सोडू नका’, असे म्हणून मयुर सोमवंशी याने कोयत्याने अजय यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

तसेच ओमकार ठोंबरे यांने भरदार वस्तू डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. जयदीप मते, विकास ढवण, सोमनाथ गुंजाळ यांनी देखील शिवीगाळ करून जिवंत सोडू नका याला संपवून टाका, अशी मारण्याची धमकी दिली. दरम्यान आरडाओरडा झाल्याने तेथे लोकांची गर्दी जमा झाली असता ते सर्वजण घटनास्थळावरून पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘दलित पॅंथरचा खासदार विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा’

अहमदनगर। नगर सहयाद्री- महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पॅंथर संघटनेने जाहिर...

लंके प्रतिष्ठानचा दावा सपशेल खोटा; भाळवणीतील कोवीड सेंटरवर सरकारचा खर्च कोट्यवधी!,

शरदचंद्र पवार साहेब कोवीड सेंटरवर अंगणवाडी सेविका, झेडपीचा मास्तर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, नर्स, डॉक्टर...

धक्कादायक! वाडा घेऊन आलेल्या धनगराची अल्पवयीन मुलगी पळवली

कान्हूरपठार येथील धक्कादायक प्रकार | पोलीस ठाण्यात हेलपाटे मारूनही मिळेना न्याय | पारनेरमधील धनगर...

भाजप नेते शिवाजी कर्डीले यांचे खासदार विखे यांच्याबद्दल मोठे विधान, म्हणाले त्यांनी…

आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे / डॉ.सुजय विखे पाटील यांचे माजी मंत्री...