spot_img
ब्रेकिंगआज बैठक! महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटणार? 'त्या' चार जागांवर एकमत होणार

आज बैठक! महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटणार? ‘त्या’ चार जागांवर एकमत होणार

spot_img

Lok Sabha Election 2024: लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीतील घटक पक्षांत जागावाटपावरून खल सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थित बैठक होऊनही जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. आज ११ तारखेच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली वारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.शुक्रवारी रात्री (ता.८) महायुतीच्या जागावाटपाबाबत अमित शहांच्या दरबारी जवळपास दोन तास खलबंत रंगली. जागावाटपाच्या मुद्द्यावर तुटेपर्यंत न ताणण्याची तयारी भाजपकडून दाखवण्यात आली आहे. मात्र, अजूनही शिंदे आणि पवार गटांना अपेक्षित तेवढ्या जागा देण्यात भाजपने तयारी दर्शवली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार,आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. कदाचित आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीचे ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असेल त्यानंतर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. प्रफुल्ल पटेल तसेच अन्य नेते बैठकीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.

महायुतीमध्ये तीन ते चार जागांवर एकमत होत नसल्याचे सांगितले जात आहे. आज होणार्‍या बैठकीत या जागांवर एकमत होण्याची शयता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटेल, असे सांगण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट..! टँकरची संख्या १५० पार

अहमदनगर | नगर सह्याद्री उन्हाच्या चढत्या पार्‍याबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. जिल्ह्यात...

पदाधिकारी नॉट रिचेबल? पारनेरची सेनापती बापट पतसंस्था व्हेंटीलेटरवर!

ठेवीदारांच्या रांगा | हवालदिल ठेवीदारांची केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे तक्रार | पदाधिकारी नॉट रिचेबल पारनेर |...

अमेरिकेतही डॉ. दीपक यांच्या संशोधनाला सन्मानाचा ‘दीप’

अहमदनगर | नगर सह्याद्री अमेरिकेतील व इतर देशातील आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट संशोधन संस्था यांच्यावतीने श्वसन प्रणालीमध्ये...

…म्हणून नगरमध्ये विजय महायुतीचाच होणार! खासदर विखे पाटलांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

श्रीगोंदा | नगर सह्याद्री अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, दक्षिण मतदार संघाचे उमेदवार...