spot_img
महाराष्ट्रकाय सांगता ! जनतेचा कौल भाजपाच्या विरोधात, फायदा उद्धव ठाकरे अन् शरद...

काय सांगता ! जनतेचा कौल भाजपाच्या विरोधात, फायदा उद्धव ठाकरे अन् शरद पवारांनाच? काय सांगतो सर्व्हे, पहा..

spot_img

मुंबई / नगर सहयाद्री : मागील दोन वर्षात महाराष्ट्रात राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
कट्टर विरोधक असलेले ठाकरे-पवार एकत्र आले. परंतु राष्ट्रवादी व शिवसेनेत बंडखोरी झाली व उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना आणि शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी गेली. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी असल्याचा दावा विरोधक सातत्याने करत आहेत. त्यातच एका सर्व्हेतूनही हेच चित्र समोर आले आहे.

राज्यात आज निवडणूक झाली तर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी युतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. याठिकाणी विरोधी महाविकास आघाडीला ४८ पैकी २६ जागा मिळतील असा अंदाज आहे. परंतु या काँग्रेसला १२ आणि उद्धव ठाकरे-शरद पवार या दोघांना मिळून १४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मूड ऑफ द नेशन या कार्यक्रमातंर्गत आजतक वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.

शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे बहुतांश नेते आणि पक्षाचे ४० पेक्षा जास्त आमदार अजित पवारांसोबत सत्तेत गेले. त्यानंतर राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न निर्माण झाला. परंतु नुकतेच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी अजित पवार गटाची असा निर्णय दिला. त्याचसोबत घड्याळ चिन्हही त्यांना सुपूर्द केले. या घडामोडीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष निसटल्याने त्यांना सहानुभूती मिळेल अशी चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. मूड ऑफ नेशनमधूनही तेच होत असल्याचे दिसते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता माघार नाहीच; उलथापालथ करावीच लागेल! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केले महत्वाचे विधान; केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार...