spot_img
अहमदनगरआमच्याकडे रिकव्हरी! तुमच्यावर अत्ता गुन्हा..? नगरच्या सराफास तोतया पोलिसांनी 'असा' घातला गंडा

आमच्याकडे रिकव्हरी! तुमच्यावर अत्ता गुन्हा..? नगरच्या सराफास तोतया पोलिसांनी ‘असा’ घातला गंडा

spot_img

अहमदनगर। नगर सह्याद्री
एका तोतया महिला पोलीस अधिकाऱ्याने नगरच्या एका सराफ व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सराफ व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून एक मोबाईल नंबर धारक व अमिनुद्दीन खान (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही, दोघे रा. उज्जैन महाकाल, मध्य प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीयांना शनिवारी (दि. २) रोजी सायंकाळी सात वाजता एक अनोळखी नंबरवरून फोन आला. टू-कॉलरवर रजणी सिंह असे नाव आले व एका महिलेच्या अंगावर पोलीस खात्याचे कपडे असल्याचा फोटो दिसला.

फोन घेतला असता, ‘उज्जैन महाकाल येथून पोलीस ऑफीसर बोलत आहे, तुमच्या दुकानाचे बिल आरोपीकडे सापडले आहे. आरोपीने तुमच्या दुकानात चोरीचे सोन्याचे दागिने देऊन त्या बदल्यात दुसरा सोन्याचा दागिना केला व त्याची पाच ग्रॅमची रिकव्हरी निघत आहे’, अशी बतावणी केली.

मी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन, अटक करील अशी धमकी दिली. त्यानंतरव्हॉट्सअॅपला क्युआर कोड पाठविला व त्यावर ३२ हजार ४०० रुपये टाकण्यास सांगितले. फिर्यादी यांनी पैसे पाठविले असता त्या महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट..! टँकरची संख्या १५० पार

अहमदनगर | नगर सह्याद्री उन्हाच्या चढत्या पार्‍याबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. जिल्ह्यात...

पदाधिकारी नॉट रिचेबल? पारनेरची सेनापती बापट पतसंस्था व्हेंटीलेटरवर!

ठेवीदारांच्या रांगा | हवालदिल ठेवीदारांची केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे तक्रार | पदाधिकारी नॉट रिचेबल पारनेर |...

अमेरिकेतही डॉ. दीपक यांच्या संशोधनाला सन्मानाचा ‘दीप’

अहमदनगर | नगर सह्याद्री अमेरिकेतील व इतर देशातील आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट संशोधन संस्था यांच्यावतीने श्वसन प्रणालीमध्ये...

…म्हणून नगरमध्ये विजय महायुतीचाच होणार! खासदर विखे पाटलांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

श्रीगोंदा | नगर सह्याद्री अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, दक्षिण मतदार संघाचे उमेदवार...