spot_img
अहमदनगरपारनेरमधील 'त्या' गावांना ‘मुळा’ तून पाणीपुरवठा

पारनेरमधील ‘त्या’ गावांना ‘मुळा’ तून पाणीपुरवठा

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
कान्हूर पठारसह १६ गावच्या योजनेचा मुख्य जलस्रोत मांडओहळ ऐवजी मुळा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातून करण्याचा मार्ग खुला झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना तशा पद्धतीचा प्रस्ताव करण्याच्या सूचना गुरुवारी (दि.२२) दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली.

कान्हूर पठारसह सोळा गाव योजनेच्या निर्मितीसाठी व दुरुस्तीसाठी शासनाने आजवर कोट्यावधी रुपये खर्च केले. या योजनेचा मुख्य जलस्रोत असलेल्या मांडओहळ धरणातच एप्रिल, मे व जून महिन्यांत पाणी शिल्लक राहत नसल्याने या योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांना ऐन उन्हाळ्यात आवश्यकता असताना पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी ही योजना असून नसल्यासारखीच आहे. स्थानिक नागरिकांनी ही स्थिती खासदार डॉ.सुजय विखे यांच्या निदर्शनास आणून दिली. ते २० फेब्रुवारी २०२४ रोजी पारनेर तालुयाच्या दौर्‍यावर आले असता या भागातील शेतकर्‍यांच्या वतीने सबंधित मागणी करण्यात आली. आता याबाबत खासदार सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सबंधित पाठपुरावा सुरु असल्याची माहिती कोरडे यांनी दिली.

पारनेर तालुयाचा पठार भाग हा सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसत आलेला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एप्रिल ते जून महिन्यांत या भागातील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होत असते. या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यावधी रुपयांची योजना निर्माण केलेली असूनही सातत्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो.

ही बाब निदर्शनास आल्याने केवळ सबंधित योजनेचा जलस्रोत अभ्यासपूर्वक निवडला नसल्याने नागरिकांना वर्षानुवर्षे पिण्यासाठीच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे कोरडे यांनी खासदार व पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर कायमस्वरूपीचा उपाय म्हणून मुळा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातून सबंधित योजनेचा जलस्रोत निर्माण केल्यास पारनेरच्या पठार भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघेल असे पत्राद्वारे सुचविले होते. आता कान्हूर पठारसह १६ गावच्या योजनेचा मुख्य जलस्रोत मांडओहळ ऐवजी मुळा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातून करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट..! टँकरची संख्या १५० पार

अहमदनगर | नगर सह्याद्री उन्हाच्या चढत्या पार्‍याबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. जिल्ह्यात...

पदाधिकारी नॉट रिचेबल? पारनेरची सेनापती बापट पतसंस्था व्हेंटीलेटरवर!

ठेवीदारांच्या रांगा | हवालदिल ठेवीदारांची केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे तक्रार | पदाधिकारी नॉट रिचेबल पारनेर |...

अमेरिकेतही डॉ. दीपक यांच्या संशोधनाला सन्मानाचा ‘दीप’

अहमदनगर | नगर सह्याद्री अमेरिकेतील व इतर देशातील आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट संशोधन संस्था यांच्यावतीने श्वसन प्रणालीमध्ये...

…म्हणून नगरमध्ये विजय महायुतीचाच होणार! खासदर विखे पाटलांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

श्रीगोंदा | नगर सह्याद्री अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, दक्षिण मतदार संघाचे उमेदवार...