spot_img
अहमदनगरAhmednagar: ...'हे' तर संधी साधु! त्र्यंबकच्या आश्रमातुन सराईत गुन्हेगारांच्या टोळीला बेड्या, 'असा'...

Ahmednagar: …’हे’ तर संधी साधु! त्र्यंबकच्या आश्रमातुन सराईत गुन्हेगारांच्या टोळीला बेड्या, ‘असा’ लावला सापळा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगारांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात वेशांतर करून बसलेले आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.

कबिर उंबऱ्या काळे (वय २२), सार्थक ऊर्फ सिव्हील ऊर्फ लंगड्या सगड्या काळे (वय २१), दोन्ही रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा, साईनाथ तुकाराम जाधव (वय ३३), रा. घोसपुरी, ता. श्रीगोंदा असे आरोपींचे नाव असून मिथुन उंबऱ्या काळे, रा. सुरेगाव, बबुशा चिंगळ्या काळे (रा. वांगदी, ता. श्रीगोंदा) यांनी मदत केली असून ते सध्या फरार आहे.

नगर तालुक्यातील पिंपळगाव कौंडा येथे शेत वस्तीवरील घरात घुसून चाकुचा धाक दाखवून जबरी चोरीकेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात बाळासाहेब रंगनाथ केदारे यांनी फिर्याद दिली होती.

या जबरी चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने समांतर तपास करून रेकॉर्डवरील गुन्हेगार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे हा गुन्हा कबीर काळे रा, सुरेगाव, ता. श्रीगोंदा याने अन्य साथीदारासह केला असल्याचे उघड केले.

दरम्यान आरोपी सध्या ब्रम्हगिरी, त्र्यंबकेश्वर (नाशिक) परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार पोलीसांच्या पथकाने पथकाने वेशांतर करुन ब्रम्हगिरी पर्वतावरील आश्रमात तिन दिवस मुक्कामी राहत आरोपींना जेरबंद केले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गणेशोत्सव: कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखाना राहिलाय का!

समाजकारण-राजकारणाचे बाळकडू मिळणारा मंडप जुगारी अड्डा अन् गुंड- मवाल्यांच्या ताब्यात गेल्याचं बाप्पाला दु:ख! ‘जय...

अहमदनगर जिल्हा बँकेत मोठी नोकर भरती; ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु…

अहमदनगर / नगर सह्याद्री - जिल्हा सहकारी बँकेत संचालक मंडळाच्या मान्यतेने सुमारे 700 पदांसाठी...

‘मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका’

आमदार राजेंद्र राऊतांचा मनोज जरांगेंना टोला सोलापूर | नगर सह्याद्री स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा...

विधानसभा निवडणूक; नव्या सर्व्हेच्या अंदाजाने मविआची चिंता वाढली; काय आहे अंदाज पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. यंदा कुणाची...