सुपा / नगर सह्याद्री
खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी दिला असून पहिल्यांदाच विखे यांनी तळागाळातील नागरिकांना न्याय दिला असल्याचे प्रतिपादन भाजपाचे तालुकाध्यक्ष राहूल पाटील शिंदे यांनी केले.
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा, पळवे खुर्द, कडूस येथील सर्व रेशन कार्ड धारकांना महसूमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून साखर व डाळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी सभापती गणेश शेळके, माजी सभापती काशिनाथ दाते, भाजप नेते विश्वनाथ कोरडे, बंडू रोहकले, युवा नेते राहुल विखे, खिलारी सर, वसंत चेडे, डॉ.अजय येणारे आदी उपस्थित होते. भोयरे गांगर्डा, पळवे खुर्द व कडूस येथील गावातील सर्व रेगुलर रेशन कार्ड धारकांना चार किलो साखर व एक किलो हरभरा डाळ वितरित करण्यात आली.
यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबासाहेब खिल्लारी, सुपा गावचे उपसरपंच दत्ता नाना पवार,संतोष शेळके सर, अहमदनगर जिल्हा दूध संघाचे मा.संचालक शशिकांतराव देशमुख, मा.जि.परिषद सदस्य शिवाजीराव गाडीलकर, वडनेरचे मा.सरपंच लहू भालेकर, वसंतराव चेडे, शिवसेना तालुकाप्रमुख बंडूशेठ रोहकले, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सुभाषराव दुधाडे, उपसरपंच अमोलराव जाधव, मा. चेअरमन वसंतराव देशमुख, मा. सरपंच नानाभाऊ गाडीलकर, किसन पाचारणे,हरिभाऊ भंडलकर, भाग्येश देशमुख, पोपटराव पाचारणे, विक्रांत देशमुख, अजय शेठ गाडीलकर, रविंद्र नवले, संपत कुटे, यांच्यासह गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.