spot_img
अहमदनगरAhmednagar:अबब!.. हा तर विश्वासघातच, ‘फोन पे’ व्दारे लुबाडले एवढे

Ahmednagar:अबब!.. हा तर विश्वासघातच, ‘फोन पे’ व्दारे लुबाडले एवढे

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
वकिलाच्या मोबाईलचा वापर करून त्यांच्या मावस भावाने दोन लाख एक हजार रूपये फोन पे व्दारे काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार २९ डिसेंबर २०२३ ते ३ जानेवारी २०२४ च्या दरम्यान मुकुंदनगर परिसरात व जिल्हा न्यायालयासमोर घडला आहे.

या प्रकरणी मुकुंदनगर परिसरातील वकिलाने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आला आहे. अमान सादिक शेख (रा. मुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी व अमान हे दोघे मावस भाऊ आहेत.

अमान याने २९ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान फिर्यादीच्या मोबाईलचा वापर करून त्यांच्या फोन पे नंबर वरून स्वतःच्या फोन पे नंबरवर विश्वासघात करून दोन लाख एक हजार रूपयांची रक्कम पाठवली. हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमान शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गणेशोत्सव: कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखाना राहिलाय का!

समाजकारण-राजकारणाचे बाळकडू मिळणारा मंडप जुगारी अड्डा अन् गुंड- मवाल्यांच्या ताब्यात गेल्याचं बाप्पाला दु:ख! ‘जय...

अहमदनगर जिल्हा बँकेत मोठी नोकर भरती; ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु…

अहमदनगर / नगर सह्याद्री - जिल्हा सहकारी बँकेत संचालक मंडळाच्या मान्यतेने सुमारे 700 पदांसाठी...

‘मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका’

आमदार राजेंद्र राऊतांचा मनोज जरांगेंना टोला सोलापूर | नगर सह्याद्री स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा...

विधानसभा निवडणूक; नव्या सर्व्हेच्या अंदाजाने मविआची चिंता वाढली; काय आहे अंदाज पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. यंदा कुणाची...