spot_img
अहमदनगरAhmednagar News : संप चिघळला!! ट्रक चालकांच्या तोंडाला काळे, चपलांचा हार आणि...

Ahmednagar News : संप चिघळला!! ट्रक चालकांच्या तोंडाला काळे, चपलांचा हार आणि पुढे..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर ड्रायव्हर युनियन संघटनेच्यावतीने केंद्र शासनाचा हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी नगर शहरातील फलटण पोलिस चौकी कोठला येथे आंदोलन सुरु होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी सुरु असलेल्या वाहनांवर हल्ला करत वाहन चालकांना काळे फासले, तसेच चालकांना चपलांचा हार घातला. दरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

अहमदनगर ड्रायव्हर युनियन संघटनेच्यावतीने फलटण पोलिस चौकी कोठला येथून शहरातील सर्व ड्रायव्हर एकत्र येऊन केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तसेच कोठला परिसरात आंदोलन सुरु होते. यावेळी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान गुरुवारी सकाळी आंदोलन कर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सुरु असलेल्या वाहनांवर हल्ला करत वाहन चालकांच्या तोंडाला काळे फासले. तसेच चालकांच्या गळ्यात चपलांचे हार घालण्यात आले. वाहनांच्या काचाला काळे फासले, वाहनाच्या हवा सोडण्यात आल्या. दरम्यान घटनेची माहिती समजताच तोफखाना, कोतवाली, भिंगार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केंद्राच्या हिट अँड रन या कायद्यामुळे ड्रायव्हर समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ड्रायव्हर गाडी चालवण्यास तयार नसून ड्रायव्हरवर उपासमारीची वेळ आली असून केंद्राचा हिट अँड रन कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी ड्रायव्हर संघटनांकडून होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप’

अहमदनगर| नगर सह्याद्री कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त...

नगरमध्ये १८ आरोग्यवर्धिनी केंद्र! बोल्हेगावसह ‘या’ भागाचा समावेश

अहमदनगर। नगर सहयाद्री केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने नगर शहरात आयुष्यमान आरोग्य मंदिर...

विधानसभेत राडा! शिंदे गटाचे ‘ते’ दोन आमदार ऐकमेंकाना भिडले, नेमकं कारण काय? पहा..

मुंबई। नगर सह्याद्री विधीमंडळाचा शुक्रवारी शेवटचा दिवस असतनाच शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाला. विधानसभेच्या...

जातीपेक्षा पक्ष मोठा झाला का? मनोज जरांगे यांचा मराठा नेत्यांवर संताप

छत्रपती संभाजीनगर। नगर सह्याद्री- मराठा समाजाचे सर्वपक्षीय जे आमदार, मंत्री आहेत त्यांनी सगेसोयरे यांच्याबाबत अधिवेशनात...