spot_img
ब्रेकिंगआई डॉक्टरांकडे आयुष्याची भीक मागत होती आणि तू... अभिनेत्रीचा पूनमवरील राग अनावर,...

आई डॉक्टरांकडे आयुष्याची भीक मागत होती आणि तू… अभिनेत्रीचा पूनमवरील राग अनावर, मागितली माफी, म्हणाली…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
पूनम पांडेच्या मृत्यूच्या स्टंटमुळे बॉलिवूडकरांसोबतच सर्वसामान्यांनाही धक्का बसला. तिच्या या कृत्यामुळे सगळीकडून राग व्यक्त केला जात आहे. कालपर्यंत जे कलाकार तिच्या निधनाचे वृत्त समजल्यावर अश्रू ढाळत होते ते आता सत्य समजल्यावर आपला रोष व्यक्त करत आहेत.

द कपिल शर्मा शो फेम कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहने सोशल मीडियावर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी पूनम पांडेबद्दल तिचा मृत्यू झाल्याची बातमी तिच्याच सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आलेली. त्यात तिला सर्वाइकल कॅन्सरमुळे आपला जीव गमवावा लागल्याचे म्हटले होते. मात्र, शनिवारी सकाळी तिने स्वत:हून आपण जीवंत असल्याची बातमी सर्वांना सांगितली आणि सर्वाइकल कॅन्सरबाबात जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा स्टंट केल्याचे कबुल केले.

या प्रकाराबाबत राग व्यक्त करताना आरती सिंहने तिच्या आय़ुष्यातील वाईट काळ शेअर केला. आपल्या आई आणि वडिलांच्या कर्करोगामुळे झालेल्या मृत्यूची आठवण झाल्याने तिने पूनमला खडसावले. ती म्हणाली, ‘हे वाईट आहे, ही कोणतीही जनजागृती नाही. माझा जन्म झाला तेव्हा या कॅन्सरमुळे मी माझी आई गमावली. पुढे कॅन्सरमुळे मी माझे वडीलही गमावले, माझी आई डॉक्टरांना विनंती करायची, कृपया मला वाचवा, माझ्या मुलीचा नुकताच जन्म झाला आहे, मला एक वर्षाचा मुलगा आहे. तू जनजागृती करत नाहीस, तर खोटं पसरवत आहेस, तू हॉस्पिटलमध्ये जा आणि बघ की लोक त्यांच्या जीवाशी कसे लढत आहेत.

ती म्हणाली, ‘हे अजिबात मान्य नाही, तू सर्वांच्या भावनांशी खेळलीस. तुला लाज वाटली पाहिजे, लोक कोणत्या स्तरावर जाऊ शकतात हे धक्कादायक आहे. तुमच्यासाठी, रेस्ट इन पीस हा फक्त एक शब्द आहे. जा आणि त्या लोकांना विचार ज्यांनी आपली माणसे गमावली आहेत. तू सोशल मीडियाचा वापर जनजागृतीसाठी नव्हे तर खोट्या आणि फसवणुकीसाठी करत आहे. खराब पीआर स्टंट.

पूनम पांडेने व्हिडिओ शेअर करुन केले स्पष्ट
आज पूनम पांडेने काही व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करून आपल्या मृत्यूचे नाटक का रचले याबद्दल उलघडा केला. व्हिडिओमध्ये ती म्हणाली की, ‘मी जिवंत आहे. सर्वाइकल कॅन्सरमुळे माझा मृत्यू झाला नाही. पण दुर्दैवाने सर्वाइकल कॅन्सरमुळे ज्या लाखो महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगू शकत नाही. अभिनेत्री म्हणाली, ‘मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आले आहे की इतर कर्करोगांप्रमाणेच सर्वाइकल कॅन्सर टाळता येऊ शकतो. तुम्हाला फक्त सर्व चाचण्या करायच्या आहेत आणि HPV लस घ्यायची आहे.

पूनमने माफी मागितली
मात्र, या स्टंटबद्दल पूनमने सोशल मीडियावर माफीही मागितली असून, आपला उद्देश केवळ जनजागृती करणे, असून कोणाला दुखावण्याचा हेतू नसल्याचे ती म्हणाली, लोकांचे लक्ष त्या मुद्द्याकडे वेधण्यासाठी आपण हा आटापिटा केल्याचे ती म्हणाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...