Bus Fire: एका राज्यात भयंकर अपघातामध्ये अनेकांनी आपला जीव गमावल्याचे वृत्त समोर आले आहे. डंपर ट्रक आणि बसला अपघातामध्ये बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. अनेक जखमींना स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार,मध्य प्रदेश राज्यातील गुना जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी अपघाताची घटना घडली. बस गुना येथून आरोनच्या दिशेने जात होती. दरम्यान समोरून येणाऱ्या डंपरने बसला धडक दिली.
धडक होताच बस उलटली आणि बसने अचानक पेट घेतला. भरगच्च बसला लागलेल्या आगेत 13 जण जिवंत जळाले असून १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.