spot_img
अहमदनगरवाळूतस्करांचे धाबे दणाणले! १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमालासह तस्कर जेरबंद

वाळूतस्करांचे धाबे दणाणले! १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमालासह तस्कर जेरबंद

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री
येथील वाळू तस्कराला १० लाख ३० हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. कृष्णा गीताराम सोनवणे (वय ३१, रा. वासुंदे, ता. पारनेर) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेने वाळू तस्कराविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केल्याने वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहे.

अधिक माहिती अशी: पारनेर तालुक्यातील अनेक भागातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होत असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचा गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली,की पांढर्‍या रंगाच्या ढंपरमधून कृष्णा सोनवणे देसवडे पोखरी रस्त्यालगत अवैध वाळू उपसा करत आहे.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत त्याच्या कडील ढंपर व तीन ब्रास वाळू असा १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपासासाठी पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता माघार नाहीच; उलथापालथ करावीच लागेल! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केले महत्वाचे विधान; केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार...