श्रीगोंदा । नगर सहयाद्री
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी मधील रेल्वे लाईनच्या शेजारी खोदलेल्या अनधिकृत शेततळ्यात बुडून शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समीर अंकुश बरकडे (वय १३, रा. निमगाव खलु, ता. श्रीगोंदा ) असे मृत मुलाचे नाव आहे.
अधीक माहिती अशी: समीर इयत्ता आठवीत शिक्षण घेतो.सोमवार दि.१ एप्रिल रोजी दुपारी शाळा सुटल्यावर समीर आणि आणि त्याचा मित्र दोघे पोहायला गेले. समीरने पाण्यात उडी मारली परंतु उडी मारल्यानंतर तो चिखलात रुतुन बसल्याने तो बाहेर निघेनासा झाला. सोबत असलेल्या मित्राने अनेकांना हातवारे करुण इशारे करत समीर बुडल्याचे सांगितले.
केलेले हातवारे खुना समजावल्यानंतर सर्वांनी शेततळ्याकडे धाव घेत पाण्यात उड्या मारुन शोध घेतला असता समीर चिखलात रुतलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह बाहेर काढून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. आई वडिलांना एकूलता एक मुलगा गेल्याचे समजताच दोघांनी हंबरडा फोडला.