spot_img
अहमदनगरधक्कादायक! मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपी असा अडकला जाळ्यात...

धक्कादायक! मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपी असा अडकला जाळ्यात…

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री
मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

हकिगत अशी की, फिर्यादी नामे महेश बाळु जाधव [वय 25 वर्षे, रा. मांडवे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर हल्ली रा. मोगरे वस्ती, साने कॉलनी, झेंडा चौक, पिंपरी चिंचवड पुणे] यांनी दिनांक 4 मे 2024 रोजी फिर्याद दिली की, त्यांचा भाऊ अविनाश बाळु जाधव [रा. मांडवे ता. पाथर्डी] हा त्याचे घरासमोर पढवीमध्ये झोपलेला असतांना त्यास कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणासाठी त्याचे डोक्यामध्ये कोणत्यातरी धारदार हत्याराने मारहाण करुन खुन केला आहे. सदर घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 486/2024 भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी पोनि/ दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी गुन्हा घडले ठिकाणी मांडवे, ता. पाथर्डी या ठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणची पाहणी केली होती. तसेच गुन्हा उघडकीस आणणेकरीता पोउपनि/सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, सुरेश माळी, संतोष लोढे, संदीप चव्हाण, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करुन पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस पथकाने गुन्हा ठिकाणी जावुन पाहणी केली असता गुन्हा घडले ठिकाणी कोठेही सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नसल्याने आरोपीची काहीएक माहिती मिळुन येत नव्हती. पथकाने मयत नामे अविनाश बाळु जाधव याचे कोणासोबत यापुर्वी वाद होते काय याबाबत माहिती काढली असता मयताचे व मयताचा मित्र अमोल नवनाथ आठरे रा. कौडगांव आठरे, ता. पाथर्डी याचेसोबत वाद झाल्याबाबत माहिती प्राप्त झाली. पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे अमोल नवनाथ आठरे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस करता त्याने कळविले की, मी व अविनाश जाधव असे दोघे मित्र होतो. अविनाश जाधव याने मला गांजा पिण्याचे व्यसन लावले होते तसेच अविनाश जाधव हा मला नेहमी गांजा ओढण्यासाठी व दारु पिण्यासाठी नेहमी पैशाची मागणी करत असे. मी व अविनाश जाधव मित्र असल्याने आमचे एकमेकांचे घरी नेहमी येणे जाणे होते. अविनाश जाधव यास दारु व गांजा ओढण्याचे व्यसन असल्याकारणाने माझे आई वडिल मला व अविनाश जाधव यास रागावुन बोलत असे.

दिनांक 1 मे 2024 रोजी अविनाश जाधव याने माझे वडिल दुध विकत असलेल्या ठिकाणी तिसगांव येथे जावुन त्यांना त्या ठिकाणी शिवीगाळ करुन, हात पाय तोडुन टाकण्याची धमकी दिली व दुध सांडुन दिले होते. त्यामुळे सदर दिवशी मी अविनाश यास तु माझे वडिलांना शिवीगाळ का केली व धमकी का दिली याबाबत जाब विचारला असता त्याने मला सुध्दा शिवीगाळ दमदाटी केली. त्या कारणावरुन दिनांक 4 मे 2024 रोजी रात्री 12.00 ते 01.00 वा. चे सुमारास मी आमचे घरुन ऊस तोडण्याचा कोयता घेवुन गाडीचा आवाज येवु नये म्हणुन माझेकडील इलेक्ट्रीक गाडीवरुन अविनाश जाधव याचे घरी जातेवेळी माझेकडील कोयत्याने रस्त्याचे कडेला असलेल्या बाभळीचे झाडाची फांदी तोडुन अविनाश जाधव याचे घरी गेलो. माझेकडील मोटारसायकल त्याचे घरासमोर लावुन त्याचे त्याचे घराकडे जावुन पाहिले असता अविनाश जाधव हा त्याचे पढवीमध्ये झोपलेला होता. मी माझेकडील बाभळीचे काठीने त्याचे डोक्यामध्ये मारले असता तो ऊठुन बसला परंतु तो नशेमध्ये असल्याने त्यास काहीएक समजत नव्हते. त्यास मी पुन्हा माझे हातातील काठीने मारले असता आमचे दोघामध्ये झटापट झाली व अविनाश जाधव हा मला मारण्यासाठी काहीतरी हत्यार शोधत असतांना मी माझे गाडीवर ठेवलेला कोयता घेवुन कोयत्याने त्याचे डोक्यावर, पाठीवर वार केले असता तो मोठ्याने आरडाओरडा करु लागल्याने मी तेथुन पळुन आलो असल्याची कबुली दिली आहे.

ताब्यात घेण्यात आलेला आरोपी नामे अमोल नवनाथ आठरे [वय 20 वर्षे, रा. कौडगांव आठरे ता. पाथर्डी, जि. अहमदनगर] यास पाथर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 486/2024 भादवि कलम 302 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...