अहमदनगर | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीत अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या, तथाकथित सर्व्हेही झाले होती. परंतु नगर दक्षिणेतून विद्यमान खासदार डॉटर सुजय विखे पाटील निश्चित विजय होतील. मात्र, त्यांचे मागच्या निवडणुकीतील मताधिय घटून एक लाखाच्या फरकाने ते विजय होतील, असा दावा विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी रविवारी येथे केला.
येत्या ३१ मे रोजी जामखेड तालुयातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव होणार असून त्याची माहिती प्राध्यापक शिंदे यांनी माध्यमांना दिली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी भाष्य केले. माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड व अरुण मुंडे, निशांत दातीर आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, निवडणूक काळात अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या, अनेक तथाकथित सर्व्हेअर निर्माण झाले होते. आचारसंहितेच्या काळात सर्व्हे रिपोर्ट जाहीर करायचे नसतात, तरीही ते जाहीर होत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरला झालेली सभा, त्या सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद, याशिवाय सर्वसामान्य शेतकरी व दुर्लक्षित-उपेक्षित समाज घटकाला मागील दहा वर्षात जाणवले. त्यामुळे नगर दक्षिणेतून विद्यमान खासदार डॉटर सुजय विखे पाटील निश्चित विजयी होणार आहेत व येत्या चार जूनला हाच निकाल लागेल, असा दावाही शिंदे यांनी केला.
२०१९ च्या तुलनेत मताधिय घटेल
प्राध्यापक शिंदे म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत खासदार डॉटर विखे यांना सुमारे पावणे तीन लाखाचे मताधिय होते. मात्र, यावेळी ते एक लाखाच्या मताधियाने विजयी होतील. कारण २०१४ पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात काय झाले होते, हे नव्या पिढीला माहीत नाही. त्यामुळे मागच्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळाचा ते विचार करतात. यामुळे काही अंशी अँटि इनकंबसीचा फटका मताधियावर होईल, पण निकालात अजिबात फरक पडणार नाही, असा दावाही प्राध्यापक शिंदे यांनी केला.