spot_img
ब्रेकिंगRam Mandir Ayodhya : ब्रेकिंग ! 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर

Ram Mandir Ayodhya : ब्रेकिंग ! 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : श्रीराम मंदिरामधील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरु आहे. आता केंद्र सरकारने 22 जानेवारीला देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

देशभरातील सरकारी कार्यालये आणि शाळा-महाविद्यालयांना सकाळपासून दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्धा दिवस सुट्टी असेल. लोकांना प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त 22 जानेवारीला केंद्र सरकारची सर्व कार्यालये अर्धा दिवस बंद राहतील.

लोकांमध्ये असलेला प्रचंड उत्साह पाहता केंद्र सरकारच्या कार्यालयांत 22 जानेवारीला अर्धा दिवस सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतभरातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठान येथे 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मांडओहोळ’ने गाठला तळ! पाणी उपसा करणाऱ्यांनो सावधान, प्रशासनाने दिला ‘हा’ इशारा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यात गावागावात व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली असून...

महिला बचत गटांसाठी खासदार विखे पाटलांचे मोठे गिफ्ट; वाचा सविस्तर

पाथर्डी | नगर सह्याद्री महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

बैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई। नगर सहयाद्री प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष 'गोल्डमॅन' पंढरीशेठ फडके...

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...