spot_img
अहमदनगरAhmednagar Breaking : जिल्हा परिषदेत तोडफोड ! राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने आक्रमक होत कार्यालय...

Ahmednagar Breaking : जिल्हा परिषदेत तोडफोड ! राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने आक्रमक होत कार्यालय फोडले

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर जिल्हा परिषदेत तोडफोड झाल्याचे वृत्त आले आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रकाश पोटे यांनी आक्रमक होत तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्हा परिषदेमधील पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय फोडले असून यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रकाश पोटे आक्रमक झाले होते. विविध गावांमधील जलजीवन योजनेंतर्गत सुरु असणारे काम नियमानुसार नसल्याचा त्यांनी यावेळी आरोप केला. ते म्हणाले, एक दीड कोटीच्या योजना या असून केवळ एक दीड फुटावर पाईपलाईन टाकली आहे. आम्ही याना लाईव्ह पुरावे दिले आहेत.

तरी देखील जिल्हा परिषदेकडून कोणतीही कारवाई झाली नाही. कार्यकारी अभियंता हे फोन उचलत नाहीत असा आरोप यावेळी प्रकाश पोटे यांनी केला. त्यांनी यावेळी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
पोटे यांनी जिल्हा परिषद सीईओंना देखील इशारा दिला असून लवकरात लवकर आम्ही सांगितलेल्या गावातील कामाची पाहणी केली नाही तर यानंतर त्यांचे कार्यालय फोडले जाईल असे त्याची म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गणेशोत्सव: कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखाना राहिलाय का!

समाजकारण-राजकारणाचे बाळकडू मिळणारा मंडप जुगारी अड्डा अन् गुंड- मवाल्यांच्या ताब्यात गेल्याचं बाप्पाला दु:ख! ‘जय...

अहमदनगर जिल्हा बँकेत मोठी नोकर भरती; ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु…

अहमदनगर / नगर सह्याद्री - जिल्हा सहकारी बँकेत संचालक मंडळाच्या मान्यतेने सुमारे 700 पदांसाठी...

‘मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका’

आमदार राजेंद्र राऊतांचा मनोज जरांगेंना टोला सोलापूर | नगर सह्याद्री स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा...

विधानसभा निवडणूक; नव्या सर्व्हेच्या अंदाजाने मविआची चिंता वाढली; काय आहे अंदाज पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. यंदा कुणाची...