spot_img
अहमदनगरइकडे उन तिकडे पाऊस! हवामान विभागाचा नवा अंदाज काय? पहा एका क्लिकवर..

इकडे उन तिकडे पाऊस! हवामान विभागाचा नवा अंदाज काय? पहा एका क्लिकवर..

spot_img

पुणे | नगर सह्याद्री
देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. सध्या कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थती आहे. अनेक भागात अवकाळी पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही देशातील काही भागासह महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात आज अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील या भागात मुसळधार पावसाची शयातहवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये सोसाट्याच्या वार्‍यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच रविवारपर्यंत जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये, तर रविवारी हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी आंबाच्या बागांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात झाडावरील आंबे वादळी वार्‍यामुळं आणि पावसामुळं खाली पडले आहेत. तर दुसरीकडं लिंबू आणि भाजीपाला पिकांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.

काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. यामध्ये वर्धा आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर राज्यातील इतर काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. त्यामुळे या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी त्यांच्या कामांचे योग्य ते नियोजन करावं जेणेकरुन वादळी पावसाचा फटका बसणार नाही. तसेच नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती खबदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाची प्रतिक्षा लांबणीवर!

मुंबई | नगर सह्याद्री आता संपूर्ण देशाला मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे. मान्सूनने केरळमध्ये धडक दिल्याने...

Ahmednagar Crime: धक्कादायक! केसेस करता म्हणून दिव्यांगाला औषध पाजून मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर। नगर सहयाद्री केसेस करतो म्हणून दिव्यांग व्यक्तीला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला....

Accident News: पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये कारचालकाने तिघांना उडवलं!

नागपूर । नगर सहयाद्री- पुण्यात अल्पवयीन चालकाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना...

Ahmednagar Crime: लिफ्ट देण्याच्या बहाणा,अन भलताच कुटाणा? नगरच्या युवका सोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री नगरमधील युवकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून इमामपूर घाटात लुटले. तसेच,...