spot_img
अहमदनगररात्री दुकान बंद केले, सकाळी उघडताच सर्वच हादरले! 'त्या' मध्यरात्री नेमकं घडलं...

रात्री दुकान बंद केले, सकाळी उघडताच सर्वच हादरले! ‘त्या’ मध्यरात्री नेमकं घडलं काय?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
किराणा दुकानाचे शटर तोडून ९० हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना आगरकर मळ्यातील शिवनेरी मार्ग परिसरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल बाबुलाल कटारीया (वय ५४) यांनी फिर्याद दिली आहे.

कटारीया यांचे आगरकर मळ्यातील घराच्या समोरील बाजूला शांती डिपार्टमेंटल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर नावाचे किराणा दुकान आहे. त्यांनी मंगळवारी (दि. ९) सकाळी सहा वाजता दुकान उघडले होते. दिवसभराचे काम करून आठवडाभराचे जमलेले ९० हजार रूपयांची रोकड त्यांनी कॅश काऊंटरमध्ये ठेऊन ड्रॉवर लॉक केले होते. रात्री ११ वाजता दुकान बंद केले.

दुसर्‍या दिवशी बुधवारी (दि. १०) सकाळी सहा वाजता ते दुकानात गेले असता त्यांना शटरचे कुलूप तुटलेले व दुकानातील सामानाची उचकापाचक झालेली दिसली. त्यांनी दुकानातील कॅश काऊंटरचे ड्रॉवर तपासले असता त्याचे लॉक तुटलेले दिसले.

त्यातील ९० हजाराची रोकड चोरीला गेल्याचे कटारीया यांच्या लक्ष्यात आले. त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. कटारिया यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार पालवे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...