spot_img
ब्रेकिंगParner News: गाव पुढार्‍याची लुडबुड! सदस्य नसलेल्यांकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न: 'यांनी'...

Parner News: गाव पुढार्‍याची लुडबुड! सदस्य नसलेल्यांकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न: ‘यांनी’ केला हल्लाबोल

spot_img

डॉ. भाऊसाहेब खिलारी | खा. सुजय विखे यांच्या माध्यमातून ३० लाख रुपयांचा निधी

पारनेर | नगर सह्याद्री

टाकळी ढोकेश्वर मधील रस्त्याचे काम खासदार सुजय विखे यांच्याच माध्यमातून मंजूर झाले आहे. त्यामुळे बाकी कोणी कुठेही ग्रामपंचायत सदस्य नसलेल्यांनी मी निधी दिला आहे असे सांगून श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा हल्लाबोल युवा नेते डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी केला आहे.

टाकळी ढोकेश्वर येथील खासदार सुजय विखे पाटील यांनी मंजूर केलेल्या गावांर्तगत बाजारतळ ते बांडेवस्ती ते वासुंदे रस्ता (इजिमा-१९५) सा.क्र. ०/० ते ४/० मजबुतीकरण डांबरीकरण करणे – ३० लक्ष कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते, भाजप प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे, राहुल पाटील शिंदे यांसह भाजपाच्या विविध पदाधिकार्यांच्या उपस्थितीत झाला.

या भूमिपूजन समारंभ प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहकले, खरेदी विक्री चेअरमन अ‍ॅड. बाबासाहेब खिलारी, सावली प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी, माजी चेअरमन बबनराव पायमोडे, चेअरमन नारायण झावरे, माजी सरपंच शिवाजी खिलारी, माजी उपसभापती विलास झावरे, ग्रापं. सदस्य बापूसाहेब रांधवन, शुभम गोरडे, आप्पासाहेब झावरे प्रमुख उपस्थिती होते.यावेळी सेवा संस्थेचे संचालक शिवाजी पाटील खिलारी, मल्हारी धुमाळ, आप्पासाहेब झावरे, रवी पायमोडे, संजय झावरे, गणप्रमुख अक्षय गोरडे, सुशांत लोंढे, ज्ञानदेव पायमोडे, गोरक्षनाथ गोरडे, देविदास अल्हाट, गणेश चव्हाण, योगेश पायमोडे, अनिल पायमोडे, धोंडीभाऊ झावरे, नानासाहेब बांडे, राजेंद्र आल्हाट, रवींद्र पायमोडे, दत्तात्रय भिंगारकर, बाळासाहेब धुमाळ, किसन बांडे, पाराजी बांडे, मारुती झावरे, कासम पठाण, भास्करराव झावरे, प्रसाद झावरे, बाबासाहेब बांडे, बी. टी. खामकर, शिवाजी रोकडे, लक्ष्मण झावरे, वैभव गोरडे, अंबादास झावरे, पांडुरंग गोरडे, राजेंद्र लोंढे, ज्ञानदेव पायमोडे, किरण धुमाळ, सागर आल्हाट, इंद्रभान गोरडे, संजय उदावंत, भीमराज पायमोडे, श्रावण गायकवाड, नितीन बांडे, ज्ञानदेव पायमोडे, सतीश बांडे, गणेश आल्हाट, मल्हारी धुमाळ, आनंद दरेकर, विनायक सोनवणे, प्रशांत चौरे, इत्यादी उपस्थित होते.

यावेळी डॉ. भाऊसाहेब खिलारी म्हणाले, बरेच वर्षापासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते. काशिनाथ दाते, राहुल पाटील व आम्ही ग्रामस्थांनी खासदार सुजय विखे यांच्याकडे या रस्त्याच्या कामाची मागणी केली होती. टाकळी ढोकेश्वर गावासह या तालुयावर विखे घराण्याचे मोठे प्रेम राहिलेले आहे. खासदार सुजय विखे या भागाचा विकास करण्यासाठी प्रामुख्याने पुढाकार घेत आहेत.

गाव पुढार्‍याने गावात लुडबुड करू नये: शिवाजी खिलारी

कोठेही सदस्य नाही, पदावर नाही असे काही मीच निधी दिल्याचे सांगतात. टाकळी ढोकेश्वर गावात हस्तक्षेप करण्याचा त्यांचा संबंध नाही. आम्ही निधी आणण्यात सक्षम आहोत. आपल्या गावात अगोदर यश पहावे इतरांनी आमच्या गावात लुडबुड करू नये. सरपंचांना ग्रामपंचायत मध्ये काय चालले हेच माहीत नाही. त्यामुळे त्यांनी बढाया मारू नये. स्वतः आपण काय केले हेच सांगावे असा टोला एका गावपुढार्‍याला टाकळी ढोकेश्वर माजी सरपंच शिवाजी खिलारी यांनी लगावला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मांडओहोळ’ने गाठला तळ! पाणी उपसा करणाऱ्यांनो सावधान, प्रशासनाने दिला ‘हा’ इशारा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यात गावागावात व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली असून...

महिला बचत गटांसाठी खासदार विखे पाटलांचे मोठे गिफ्ट; वाचा सविस्तर

पाथर्डी | नगर सह्याद्री महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

बैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई। नगर सहयाद्री प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष 'गोल्डमॅन' पंढरीशेठ फडके...

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...