spot_img
अहमदनगरAhmednagar: रोहोकलेंच्या विचार प्रवाहात संघटनात्मक कार्य करणार: काकडे

Ahmednagar: रोहोकलेंच्या विचार प्रवाहात संघटनात्मक कार्य करणार: काकडे

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
भविष्यात आपण समाजकारण व संघटनात्मक काम रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर या विचार प्रवाहात संघटनात्मक कार्य करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते नितीन काकडे यांनी केले.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची सहविचार सभा नगरला मार्केट कमिटीत झाली. या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नितीन काकडे, सुनील खाडे, शरद खंडागळे, दत्तात्रय चोथे, बाळासाहेब रौंदळ, विष्णू गवसने, संजय वाघ,प्रकाश जाधव, दत्ता ठुबे यांचा सन्मान करुन स्वागत केले. काकडे म्हणाले, जिल्हाभरातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील काही बांधव केवळ शिक्षक बँकेपुरते मर्यादित राजकारण करतात. परंतु त्यांना शिक्षकांचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत. शिक्षकांचे प्रश्न आत्मियतेने सोडविण्याचे कार्य रावसाहेब रोहोकले गुरुजी व त्यांचे पदाधिकारी सातत्याने करतात. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर या विचार प्रवाहात संघटनात्मक कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात जिल्हाभरात मोठे संघटन उभे करण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी केला असून निश्चीतपणे यात आम्हाला यश येईल.

यावेळी नितीन काकडे व त्यांच्या सर्व सहकार्‍यांचा सन्मान संजय शेळके, प्रविण ठुबे, आर. पी. राहाणे, विकास डावखरे, दत्तात्रय गमे, मिलिंद तनपुरे, सुभाष गरुड, बाबासाहेब पवार, अविनाश निंभोरे, राजू इनामदार, शंकर गाडेकर, गणपत सहाणे, गणेश वाघ, दादा विधाते, गणेश पिंगळे, श्रीम स्वाती झावरे-शिंदे, अशोक गिरी, बाळासाहेब बांबळे, संतोष अकोलकर, कल्याण पोटभरे, राजू मुंगसे, श्रीकृष्ण खेडकर, संजय शिंदे, अशोक बचाटे आदींनी केला.

शिक्षकांचे प्रश्न सुटणार
विनोद देशमुख, राज कदम, अशोक जाधव, सुभाष लवांडे, सुरेश खेडकर, मंगेश खिलारी, अशोक गिरी आदी पदाधिकारी सत्तेच्या मागे न जाता स्वाभिमानाने जेथे शिक्षकांचे प्रश्न सुटतात त्या व्यासपीठावर येत आहेत. आगामी काळात अहमदनगर जिल्ह्यात संघटन मोठे होणार असून शिक्षकांचे प्रश्न सुटणार असल्याने अजूनही समविचारी पदाधिकारी व कार्यकर्ते भविष्यात मोठ्या प्रमाणात रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्या विचारधारेत सक्रिय होतील, असे शिक्षक नेते मंगेश पाटील खिलारी यांनी सांगितले.

रावसाहेब रोहोकले गुरुजी हीच आमची संघटना
रावसाहेब रोहोकले गुरुजी हीच आमची संघटना आहे. सर्वच प्रमुख पदाधिकार्‍यांनी एकमताने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात जाण्याचा निर्णय रोहोकले गुरुजी यांना सांगितला. त्यामुळे आम्ही सर्वजण संभाजीराव थोरात आणि रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघात आजपासून सक्रिय होत आहोत, असे संजय शेळके, प्रविण ठुबे, आर. पी. राहाणे, विकास डावखरे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी सहविचार सभेत सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तीन मजली इमारत कोसळली; आठ जणांचा मृत्यू, कुठे घडली घटना?

building collapse : तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत ८...

‘नागेबाबा मल्टीस्टेटच्या कार्याचे केंद्रीय सहकार खात्याने केले कौतुक’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- येथील नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या कार्याचे विशेष कौतुक केंद्रीय सहकार खात्याचे मुख्य...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जातकांना मिळणार गोड बातमी

मुंबई नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे...

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...