spot_img
राजकारण'मांडवे खुर्द गावाला 'आर. आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार'

‘मांडवे खुर्द गावाला ‘आर. आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार’

spot_img

मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील मांडवे खुर्द गावाला विविध शासकीय योजना राबविल्याबद्दल व निकष पूर्ण केल्याबद्दल आर.आर.पाटील (आबा) मसुंदर गाव पुरस्कारफ महसूल मंत्री राधाकृष्ण विखें पाटील यांच्या हस्ते गुरुवारी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सरपंच सोमनाथ आहेर व ग्रामपंचायत सदस्य सह प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर उपस्थित होते.

सन २०२१ सन २०२२ सलग दोन वर्षांमध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हा परिषद गटामध्ये प्रथम पारितोषिक प्रतिवर्ष रक्कम रुपये ५० हजार याप्रमाणे १ लाख रकमेचे पारितोषिके पटकविण्यात आले व या सर्व सर्वाचा परिपाक म्हणून सन २०२१ -२२ या वर्षामध्ये आर आर आबा सुंदर ग्राम स्पर्धेत गावाने सहभाग नोंदवला व साधारण २०० गुणांचे मूल्यमापन गावाचे जिल्हास्तरीय समितीने करण्यात त्यातही गावाने तालुक्यामध्ये प्रथम पारितोषिक रक्कम रुपये १० लक्ष रुपये मिळवून गावाची यापूर्वीची पारितोषिक मिळवण्याची परंपरा कायम राखण्यात आली.

तरुण तडफदार सरपंच सोमनाथ आहेर यांच्या खंबीर नेतृत्वात सत्तेत आल्यापासून गावात विविध विकास कामांचा डोंगर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या साथीने ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबतीने शासनाच्या विविध योजना अत्यंत कुशल आणि कुशाग्र पद्धतीने गावामध्ये राबविण्यात आल्या मूलभूत सुविधा त्याचप्रमाणे सार्वजनिक लोक हिताची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. गावांतील अंतर्गत रस्ते, शाळा बांधकाम, वृक्ष लागवड, सर्व गावांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे, सार्वजनिक शौचालये, वाड्या- रस्त्यापर्यंत डांबरीकरन, ब्लॉक बसविणे अनुसूचित जाती जमाती वस्त्यांचा विकास, रस्ता दुतर्फा हायमॅक्स दिवे,जलशुद्धीकरण प्रकल्प, स्मशानभूमी परिसरात सुधारणा, अशा अनेक कामांमधून गावाच्या विकासाचा आलेख अल्पावधीत नावा रूपाला आणला. त्याचीच परिणीती म्हणून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सत्तेत आल्यापासून सरपंच सोमनाथ आहेर, उपसरपंच मनीषा जाधव, माजी सरपंच जगदीश पाटील, गागरे गौतम, बागुल सागर, चंद्रभान पवार, कमल चंद्रकांत गागरे, रेश्मा रेवननाथ गागरे, मंदाकिनी संपत जाधव, पूजा ज्ञानेश्वर गागरे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर आप्पाजी खोडदे, ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब तुळशीराम गागरे, संपत धोंडीबा बर्डे, बाळासाहेब जाधव या सर्वांची मोलाची साथ लाभली व गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ, पदाधिकारी, कर्मचारी यांच्या भरीव योगदानाने मांडवे खुर्द गावची आगळी वेगळी ओळख स्मार्ट ग्राम पुरस्काराच्या निमित्ताने तालुक्यात निर्माण झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर तालुका जैन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी राजेश भंडारी, उपाध्यक्ष पदी प्रसाद कर्नावट

जैन महासंघाची तालुका कार्यकारणी घोषित पारनेर / नगर सह्याद्री - तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील...

भगवान महावीर जयंतीनिमित्त नगरमध्ये भव्य शोभायात्रा

त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की असा जयघोष / आनंदधामच्या प्रांगणात साधूसाध्वीजींच्या...

Sharad Pawar : शिंदे गटाच्या आमदाराचा शरद पवारांवर गंभीर आरोप, लायकीच काढली…

सातारा / नगर सह्याद्री - Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीसाठी राजकारण चांगलेच तापले आहे. टोकाचे...

Mp sujay vikhe patil : पंतप्रधानांनी अहमदनगरांसाठी काय केलं? खासदार विखे पाटलांनी सांगितला इतिहास…

अहमदनगर / नगर सह्याद्री Mp sujay vikhe patil : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच...