spot_img
अहमदनगर'अतिक्रमण करणाऱ्यांना संधी न देता निष्ठावंतालाच आमदार करा', जगतापांवर अप्रत्यक्ष टीका

‘अतिक्रमण करणाऱ्यांना संधी न देता निष्ठावंतालाच आमदार करा’, जगतापांवर अप्रत्यक्ष टीका

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर शहरात भाजपाने खासदार, केंद्रीय मंत्री, महापौर, उपमहापौर अशा सर्व पदांवर काम केले आहे. मात्र अद्यापही शहराचा आमदार भाजपचा झालेला नाही ही सल कायम मनात आहे. आता पक्ष खूप सुस्थितीत असून वातवरणही अनुकूल आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अभय आगरकर यांच्या पराभवासाठी नात्यागोत्यातील तालुक्याच्या नेत्याने दुहेरी निष्ठा ठेवत आपल्याला फार मोठा धोका दिला. त्यामुळे मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता जागे व्हा, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परीस्थितीत पक्षात अतिक्रमण करू पाहणाऱ्या डोमकावळ्यांना संधी न देता भाजपचाच निष्ठावान कार्यकर्त्याला आमदार करणे आवश्यक आहे. राज्यात कितीही राजकीय उलथापालथी झाल्या तरी तुम्ही थांबू नका. नगरचा पुढील आमदार भाजपाचाच व्हावा यासाठी शहर कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांवर खूप मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यानी केले.

पंडीत दीनदयाळ परिवाराच्या वतीने शहर भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा एकत्रित सत्कार ऋग्वेद भवन येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी वसंत लोढा यांनी तळमळीने भावना व्यक्त केल्या. यावेळी दीनदयाळ पतसंस्थेचे मानद सचिव विकास पाथरकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर आदींसह शहर कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

वसंत लोढा मनातील खदखद व्यक्त करत म्हणाले, नगर शहरात एकाच घरात दोन आमदार, महापौर, नगरसेवक, त्यांचेच नातेवाईक ही आमदार असे असतानाही नगरची अवस्था आज किती बिकट झाली आहे हे सर्वांना दिसतच आहे. भाजपचा महापौर असताना व आताच्या शिवसेनेच्या महापौर असताना महापालिकेची सत्ता कोण चालवतय हे सांगण्याची गरज नाहीये. याचा मोठा परिणाम शहराच्या विकासावर झाला आहे.

आता हे चित्र बदलणे अत्यावश्यक आहे. २०२४ ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कोणतीही दुहेरी निष्ठा न ठेवता एकनिष्ठेने भाजपच्याच उमेदवाराचे काम करावे. जर पक्षाचा कोणी पदाधिकारी कार्यकर्ता अशी दुहेरी भूमिका घेत काम करत असेल तर त्याला बाजूला करा, असे आवाहन केले.
अॅड.अभय आगरकर म्हणाले, वसंत लोढा यांनी तळमळीने व्यक्त केलेली खदखद योग्यच आहे.

शहरात भाजपाची ताकद पूर्वीपासूनच आहे. भाजपच्याच मोठ्या मदतीशिवाय तब्बल पाचवेळा शहरातून शिवसेनेचा आमदार होणे शक्यच नव्हते. आता येणारा काळ जरी संघर्षाचा असला तरी अनुकूल आहे. आमदारकीचे स्वप्न साकार करायचे असेल तर सामुहिक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.

यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे भूमिका मांडणे आवश्यक आहे. मात्र महानगरपालिकेत पक्षाचा एकही नगरसेवक परखडपणे आपली भूमिका मांडत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. ही परिस्थिती बदलने आवश्यक आहे. यासाठी लवकरच शहरातील पदाधिकाऱ्यांना व नगरसेवकांना रामभाऊ म्हाळगी सभागृहात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नागेबाबा मल्टीस्टेटच्या कार्याचे केंद्रीय सहकार खात्याने केले कौतुक’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- येथील नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या कार्याचे विशेष कौतुक केंद्रीय सहकार खात्याचे मुख्य...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जातकांना मिळणार गोड बातमी

मुंबई नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे...

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...