spot_img
देशजगातील सर्वात महागड्या कर्करोग उपचारावर भारतीय संशोधन

जगातील सर्वात महागड्या कर्करोग उपचारावर भारतीय संशोधन

spot_img

एसएमबीटीकॅन्सर इन्स्टीट्यूटमध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांवर अत्याधुनिक कार टी-सेल थेरपी यशस्वी / इम्म्युनोअॅक्ट आणि एसएमबीटी हॉस्पिटल करारबद्ध / ब्लड कॅन्सरवरील संशोधन / टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे तांत्रिक मार्गदर्शन
संगमनेर / नगर सह्याद्री –
कर्करोग उपचारावर महत्वाची समजली जाणारी ‘कार टी सेल’ (CAR-T) थेरपी एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये नुकतीच झाली. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठया चॅरीटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये जगातील सर्वात अत्याधुनिक थेरपी करण्यात आल्यामुळेग्रामीण भागात कर्करोगावर अद्ययावत उपचाराच्या दृष्टीकोनातून हा मोठा टप्पासमजला जात आहे. इम्म्युनोअॅक्ट (ImmunoACT) च्याक्लिनिकल ट्रायल अंतर्गत व टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ५० रुग्णांवर हे उपचार करण्यात आले. यातील दोन रुग्ण एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर ही थेरपी यशस्वी झाली. दोन्हीही रुग्णांना चांगले परिणाम बघावयास मिळत असल्याची माहिती एसएमबीटीचे मेडिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ लविन विल्सन यांनी दिली.

इम्म्युनोअॅक्ट (ImmunoACT) डॉ राहुल पूरवार यांनी संशोधन केलेली संस्था आहे. टाटा मेमोरियल सेंटरच्या ब्लड कॅन्सरविभागाचे डॉ हसमुख जैन यांच्यासह तज्ञांच्या उपस्थितीत प्रिन्सिपल क्लिनिकलइन्व्हेस्टीगेशन करण्यात आले. जगातील सर्वात महागड्या समजल्या जाणाऱ्या कर्करोग उपचारावर कमीत-कमीखर्चात ब्लड कॅन्सर झालेल्या रुग्णांवर उपचार करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयआयटी मुंबई व टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये संशोधन सुरु होते. अखेरीस या उपचार पद्धतीला मान्यता मिळाली असून सुरुवातीला ५० रुग्णांवर हे उपचार करण्यात आले. यातील दोन रुग्ण एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटमध्येदाखल करूनत्यांच्यावर ही थेरपी यशस्वी झाली.

शरीरातील पांढऱ्या पेशींना औषधोपचारांच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्तींमध्ये बदलले जाते. त्यामुळे या पेशी शरीरातील कर्करोग पेशींचा नाश करण्यासाठी काम करू लागतात. टी पेशी रुग्णाच्या रक्तातून गोळा केल्या जातात आणि मानवनिर्मित रिसेप्टरसाठी जनुक जोडून प्रयोगशाळेत अनुवांशिकरीत्या सुधारित केले जातात, ज्याला काइमरिक प्रतिजन रिसेप्टर किंवा ‘सीएआर’ म्हणतात. हे विशिष्ट कर्करोग पेशी प्रतिजन ओळखण्यात मदत करते. त्यानंतर, सीएआर टी पेशी रुग्णाला परत केल्या जातात. अशा माध्यमातून कार-टी सेल थेरपी कार्य करते.

जगातील कॅन्सर उपचारावर होत असलेल्या कोट्यावधी रुपयांचा खर्च भारतीय संशोधनामुळे आता लाखांत आला आहे. एसएमबीटी हॉस्पिटल आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी सामंजस्य करारामुळे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे तांत्रिक मार्गदर्शनाने एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट साकारण्यात आले आहे.

याठिकाणी सुसज्ज कर्करोग विभाग कार्यरत असून तज्ञ आणि अनुभवी कर्करोग तज्ञांची मोठी टीम पूर्णवेळ उपलब्ध आहे. एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटमध्येकारटी सेल (CAR-T) थेरपीने उपचार करण्यात आलेल्यादोन्ही रुग्णांनी उपचारास चांगला प्रतिसाद दिला आहे. अत्याधुनिक उपचाराच्या सुरुवातीलाच मोठे यश आले असूनमागील एका महिन्यात रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. हि अतिशय आनंदाची बाब आहे व येणाऱ्या काळात या थेरपीने कॅन्सर बरा करण्यासाठी जोरदार प्रयत्न होणार असल्याचे डॉ विल्सन म्हणाले.

एसएमबीटीत जानेवारीपासून सेल थेरपीजानेवारीपासूनएसएमबीटी हॉस्पिटलमध्ये सेल थेरपी युनिट (बीएमटी) युनिट सुरु करण्यात येणार आहेत. तेव्हापासूनप्रत्यक्षात रुग्णांवर उपचार सुरु होणार आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात आता कार्टी-सेल थेरपी होणारअसून येथील निसर्गरम्य वातावरणात रुग्ण बरा होण्याचा दर यानिमित्ताने वाढणार असल्याचे तज्ञ सांगतात.

एसएमबीटी हॉस्पिटल व टाटा मेमोरियलहॉस्पिटल कराराचा फायदाएसएमबीटीचे मेडिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ.लविन विल्सन, डॉ.आफरीन कोटडिया, डॉ.सुचिता, विजय ब्रदर, विठ्ठल ब्रदर, किशोर ब्रदर यांनी विशेष प्रशिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे, नियमित टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे हे प्रशिक्षण दिले जात असून यामुळे ग्रामीण भागापर्यंत प्रशिक्षित स्टाफ यामुळे रुग्णांची काळजी घेण्यासाठी तयार होऊ लागला आहे. दोनवर्षांपूर्वी कर्करोग उपचारासाठी एसएमबीटी हॉस्पिटलने टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबततांत्रिक मार्गदर्शनाचा करार केला असून या सर्व गोष्टींचा फायदा या करारामुळे होत आहे.

कर्करोगावरहे उपचार उपलब्धएसएमबीटी कॅन्सर इन्सिट्यूटमध्येटाटा स्मारक केंद्र यांच्या तांत्रिक मार्गदर्शनासह कॅन्सर रुग्णांवर उपचार केले जातात. मोफत बाह्यरुग्ण तपासणी यात ऑन्कोसर्जरी, तोंडाची सर्जरी, ब्रेस्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी तसेच मेडिकल ऑन्कोलॉजी कमोरेपी, इम्युनोथेरेपी, हार्मोनिल थेरपी करण्यात येते. मुंबईच्या टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटमधीलतज्ञांच्या मार्गदर्शनाने येथील सेवेवर रुग्णांचा विश्वास दृढ झाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...