spot_img
मनोरंजनअजून एक अभिनेत्री करणार देशाच्या राजकारणात एंट्री; चाहते म्हणतायेत..

अजून एक अभिनेत्री करणार देशाच्या राजकारणात एंट्री; चाहते म्हणतायेत..

spot_img

मुंबई – माणूस मोठा झाला कि त्याला राजकारणाचे वेध लागतात. असेच काहीसे सिने अभिनेते, अभिनेत्री यांच्याबाबत घडत आहे. हेमा मालिनी, जया प्रदा, जया बच्चन, स्मृती इराणी यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री अक्षरा सिंह राजकारणात एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे.

चित्रपटांत काम करून नाव आणि पैसा मिळविणार्‍या अनेक कलाकारांना राजकारणाचे प्रवेशद्वार खुणावतात. चिराग पासवान, किरन खेर, हेमा मालिनी, गोविंदा, परेश रावल, मुनमुन सेन, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, आधिकारी दीपक, बाबुल सुप्रीयो, भगवंत मान, जयाप्रदा, रवी किशन, जया बच्चन, स्मृती इराणी अशा कलाकारांनी लोकसभेपर्यंत मजल मारली. यात आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले जाणार आहे.

यामध्ये भोजपुरी चित्रपटातील अक्षरा सिंह हिने राजकारणात प्रवेश कारणाचा निर्णय घेतला आहे. अक्षरा हिने प्रशांत किशोर यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आले आहे. किशोर यांच्या जनसुराज अभियानात ती सामील झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत ती जनसुराज पक्षाची उमेदवार असणार आहे. यामुळे चाहतेही विचारात पडले आहेत. अभिनेत्री अक्षरा सिंह हिने बिहारची राजधानी पाटणा येथील पक्ष कार्यालयात पक्षाचे सदस्यत्व घेतले.

काही दिवसांपूर्वी अक्षरा सिंह हिने आपण राजकारणात येणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसातच अक्षराने जनसुराज अभियानाचे सदस्यत्व घेतले. आगामी काळात होणारी लोकसभा निवडणुक ती लढविणार असल्याच्या चर्चा आहेत. अक्षरा कोणत्या मतदारसंघातून लढणार हे लवकरच स्पष्ट होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाची प्रतिक्षा लांबणीवर!

मुंबई | नगर सह्याद्री आता संपूर्ण देशाला मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे. मान्सूनने केरळमध्ये धडक दिल्याने...

Ahmednagar Crime: धक्कादायक! केसेस करता म्हणून दिव्यांगाला औषध पाजून मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर। नगर सहयाद्री केसेस करतो म्हणून दिव्यांग व्यक्तीला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला....

Accident News: पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये कारचालकाने तिघांना उडवलं!

नागपूर । नगर सहयाद्री- पुण्यात अल्पवयीन चालकाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना...

Ahmednagar Crime: लिफ्ट देण्याच्या बहाणा,अन भलताच कुटाणा? नगरच्या युवका सोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री नगरमधील युवकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून इमामपूर घाटात लुटले. तसेच,...