spot_img
ब्रेकिंगप्रशासनाचा नाकर्तेपणा! 'त्या' प्रश्नासाठी नारायणगव्हाणकर पुन्हा आक्रमक, दिला 'असा' इशारा

प्रशासनाचा नाकर्तेपणा! ‘त्या’ प्रश्नासाठी नारायणगव्हाणकर पुन्हा आक्रमक, दिला ‘असा’ इशारा

spot_img

सुपा / नगर सह्याद्री
भूसंपादन प्रक्रिया पार पाडून ग्रामस्थांना जागेचा योग्य मोबदला देऊन चौपदरीकरणाचे तातडीने काम पूर्ण करण्यात यावे. सदर काम प्रलंबित राहिल्यानंतर रस्त्यावर काही अपघातजन्य अनर्थ घटना घडल्यास संबंधित विभागाचे अधिकारी कार्यवाहीस जबाबदार राहतील तसेच दि.१० मार्च पासून काम सुरू झाले नाही तर ११ मार्च पासून गावांमध्ये आमरण उपोषण व ग्रामसंरक्षण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांनी दिला.

नगर- पुणे महामार्गावर नारायणगव्हाणसह सुप्याच्या प्रलंबित चौपदरीकरणाच्या कामामुळे सातत्याने महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी होऊन अपघात घडत आहेत. सदर प्रश्नावर विविध आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामस्थांकडून लक्ष वेधण्यात आले आहे. नारायणगव्हाण गावचे ९४५ पैकी ८१५ मीटरचे काम पूर्ण झाले आहे. परंतु १३० मीटरचे काम बाकी असून महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना महामार्गावर जाणे अत्यंत धोकादायक बनले आहे.

दिनांक १५ फेब्रुवारी रोजी तहसीलदार पारनेर यांच्या अध्यक्षतेखाली नारायणगव्हाण येथील रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एस.के भावसार उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग, अहमदनगर यांनी सदरचा प्रस्ताव दिनांक ०८ फेब्रुवारी रोजी भूसंपादन समन्वयक अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्याबद्दल सांगितले. चौपदरीकरणाच्या कामासाठी अधिकार्‍यांच्या नियुक्तीचे काम जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रलंबित असून प्रस्ताव सादर करण्यापूर्वीच मोजणी फी उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे भरली आहे परंतु प्रस्ताव मान्यता मिळाली नसल्याचे तालुका उपाध्यक्ष भूमि अभिलेख यांनी सांगितले होते.

तात्काळ प्रस्तावाला मान्यता देऊन चौपदरीकरणाचे तातडीने काम पूर्ण करण्यात यावे. तसेच दि.१० मार्च पासून काम सुरू झाले नाही तर दिनांक ११ मार्च पासून गावांमध्ये आमरण उपोषण व अंदोलन करण्यात येईल. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे संबंधित विभागांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट..! टँकरची संख्या १५० पार

अहमदनगर | नगर सह्याद्री उन्हाच्या चढत्या पार्‍याबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. जिल्ह्यात...

पदाधिकारी नॉट रिचेबल? पारनेरची सेनापती बापट पतसंस्था व्हेंटीलेटरवर!

ठेवीदारांच्या रांगा | हवालदिल ठेवीदारांची केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे तक्रार | पदाधिकारी नॉट रिचेबल पारनेर |...

अमेरिकेतही डॉ. दीपक यांच्या संशोधनाला सन्मानाचा ‘दीप’

अहमदनगर | नगर सह्याद्री अमेरिकेतील व इतर देशातील आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट संशोधन संस्था यांच्यावतीने श्वसन प्रणालीमध्ये...

…म्हणून नगरमध्ये विजय महायुतीचाच होणार! खासदर विखे पाटलांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

श्रीगोंदा | नगर सह्याद्री अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, दक्षिण मतदार संघाचे उमेदवार...