spot_img
अहमदनगरबनावट कागद पत्राद्वारे योजनेचा लाभ? 'कटके' अडकले जाळ्यात, 'असा' घडला प्रकार

बनावट कागद पत्राद्वारे योजनेचा लाभ? ‘कटके’ अडकले जाळ्यात, ‘असा’ घडला प्रकार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
बनावट मासिक वेतन पत्रिका तयार करून भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरूवारी (दि. ७) सायंकाळी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरूण संभाजी कटके व तुकेश अरूण कटके (दोघे रा. कटके मळा, जुना शिरसाठ वाडी रस्ता, पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित शिवाजी कदम (रा. कराड रस्ता, पंढरपुर, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. तुकेश कटके याने अरूण कटके याच्या मासिक वेतन पत्रिकेyत फेरफार करून बनावट पत्रिका तयार केली.

भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ती पत्रिका येथील समाज कल्याण कार्यालयाला सादर केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे सन २००५ ते २००७ मध्ये भारत सरकार शिष्यवृत्तीचा एकुण दोन हजार ११७ रूपयांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली. सदरचा प्रकार रोहित कदम यांनी येथील समाज कल्याण विभागाच्या निदर्शनास आणुन दिला.

त्यांनी कदम यांना १८ सप्टेंबर २०२३ रोजी पत्राव्दारे कळविले की, विद्यार्थ्याने तत्कालिन कालावधीत सक्षम अधिकारी यांच्या स्वाक्षरीचा उत्पन्नाचा दाखला महाविद्यालयास व महाविद्यालयाने ऑफलाइन अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह या कार्यालयास सादर केला आहे.

त्यानुसार या कार्यालयाकडून योजनेचा लाभ मंजूर केल्याचे दिसून येत आहे, असे उत्तर दिले. दरम्यान समाजकल्याण विभागाकडून पुढील कार्यवाहीस टाळाटाळ होत असल्याने कदम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज केला होता. अर्ज चौकशीनंतर गुरूवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर तालुका जैन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी राजेश भंडारी, उपाध्यक्ष पदी प्रसाद कर्नावट

जैन महासंघाची तालुका कार्यकारणी घोषित पारनेर / नगर सह्याद्री - तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील...

भगवान महावीर जयंतीनिमित्त नगरमध्ये भव्य शोभायात्रा

त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की असा जयघोष / आनंदधामच्या प्रांगणात साधूसाध्वीजींच्या...

Sharad Pawar : शिंदे गटाच्या आमदाराचा शरद पवारांवर गंभीर आरोप, लायकीच काढली…

सातारा / नगर सह्याद्री - Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीसाठी राजकारण चांगलेच तापले आहे. टोकाचे...

Mp sujay vikhe patil : पंतप्रधानांनी अहमदनगरांसाठी काय केलं? खासदार विखे पाटलांनी सांगितला इतिहास…

अहमदनगर / नगर सह्याद्री Mp sujay vikhe patil : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच...