spot_img
अहमदनगरखळबळजनक! नगरच्या कोठल्यात गोळीबार, कारण काय? पहा..

खळबळजनक! नगरच्या कोठल्यात गोळीबार, कारण काय? पहा..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणार्‍या युवकावर कुर्‍हाड, चॉपरने वार करून गोळीबार केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री कोठला भागात घडली. सरवर अस्लम शेख (वय ३३, सुभेदार गल्ली, नगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी माळीवाडा बसस्थानक परिसरात प्रवासी भाड्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली.

सरवर अस्लम शेख याचा टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स (मुसाफिर ट्रॅव्हल्स) चा व्यवसाय आहे. २५ एप्रिल रोजी त्याचे टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणार्‍या दानिश फारुख शेख उर्फ धन्या व साहील भाऊ (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यासोबत माळीवाडा बस स्थानक येथे प्रवासी सिट भाड्यावरुन किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री१२ वाजण्याच्या सुमारास सरवर व त्याचा मित्र सादीक शेख शफी हे कोठला येथील बाकड्यावर बसलेले असताना दानिश उर्फ धन्या याने सरवर याच्यावर कुर्‍हाडीने वार केला.

त्यानंतर साहील याही कुर्‍हाडीने वार केला. सरवर हा तेथून पळून जात असताना उफेर उर्फ लाला व गणेश पोटे उर्फ टिंग्याने चॉपरने वार केला. तर तालीब (पूर्ण नाव माहीत नाही) याने दगड फेकून मारला. त्यानंतर धन्या उर्फ दानिश याने बंदुकीने सरवर याच्यावर गोळ्या झाडल्या. यावेळी गोळ्या चुकवू नको भाई, मेंबरने बोले वैसा कर, असे साहिल याने धन्या याला सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तोफखाना पोलिसांनी पाचही जणांवर खुनाचा प्रयत्न, आर्म ट व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी कुणालाही अटक झालेली नव्हती. ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपींपैकी काही जणांवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास तोफखाना पोलिस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...