spot_img
मनोरंजनगब्बरची भूमिका करणार होता डॅनी, शत्रुघ्न सिन्हा.. गाजलेल्या 'शोले' चित्रपटासंदर्भातील काही गमतीजमती..!

गब्बरची भूमिका करणार होता डॅनी, शत्रुघ्न सिन्हा.. गाजलेल्या ‘शोले’ चित्रपटासंदर्भातील काही गमतीजमती..!

spot_img

नगर सह्याद्री टीम : 1975 साली प्रदर्शित झालेला ‘शोले’ हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटात अमिताभ व्यतिरिक्त धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि अमजद खान मुख्य भूमिकेत दिसले होते. शोलेचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले होते. या चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारणारा अमजद खान आजही त्याच्या अभिनयामुळे लक्षात राहतो, मात्र याआधी ही भूमिका अमजद नव्हे तर डॅनी डेंजोंगप्पा साकारणार होते.

अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते, ‘मी आणि रमेश सिप्पी साहेब बंगळुरूला गेलो होतो. इथेच आम्ही ठरवले की हे चित्रीकरण करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. रमेश जी बऱ्याच दिवसांपासून शूटिंगच्या शोधात होते. पण जेव्हा हा निर्णय घेण्यात आला तेव्हा एकदा आम्ही आणि रमेश जी बंगलोरमध्ये होतो तेव्हा त्यांनी सांगितले की डॅनी हा चित्रपट करू शकणार नाही कारण त्यांना तारखांच्या बाबतीत काही समस्या आहे.

अमिताभ पुढे म्हणाले, ‘यानंतर अमजद खान साहेबांना कास्ट करण्यात आले तेव्हा त्यातही खूप चर्चा झाली. पण चित्रपट केल्यानंतर मला कळाले की माझ्या आधी शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्याने चित्रपट सोडण्यामागचे मुख्य कारण अद्याप मला समजलेले नाही.

अमजद खान यांना भूमिका कशी मिळाली? चित्रपटाचे लेखक सलीम खान म्हणाले होते, ‘रमेश सिप्पी जी चित्रपटात गब्बरची भूमिका करण्यासाठी कोणालातरी शोधत होते. अमजद खान यांची सकाळी अचानक भेट झाली होती. मी त्याला पाहिलं आणि याआधीही मी त्याचा अभिनय अनेकदा पाहिला होता.

मी त्यांना दुसऱ्या दिवशी रमेशजींच्या कार्यालयात यायला सांगितले. यानंतर रमेशजींनी अमजदला पाहिले आणि म्हणाले की ठीक आहे हा माझ्या चित्रपटाचा गब्बर असेल.
शोले मधून चर्चेत आल्यानंतर अमजद खान यांचा एक भीषण अपघात झाला होता. त्यानंतर तो ‘कोमा’मध्ये गेला. यानंतर त्याने अनेक वेळा पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. 1992 मध्ये त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या आठ दिवसात राजकीय स्फोट होणार’, चर्चांना उधाण

यवतमाळ / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून विविध घडामोडी घडतायेत. नुकतेच...

Politics News : अशोक चव्हाणांनी केला आणखी एक भूकंप ! ‘त्या’ ५५ बड्या नेत्यांनी काँग्रेसला ठोकला रामराम

नांदेड / नगर सह्याद्री : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येत काँग्रेसला...

‘मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमांतून सव्वा दोन कोटींची विकासकामे’

सचिन वराळ पाटील यांची माहिती निघोज। नगर सहयाद्री- निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये...

मराठा आंदोलनाचा थरार ! समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न, तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक

जालना / नगर सह्याद्री : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण...