spot_img
महाराष्ट्रमोठी बातमी ! छगन भुजबळांना ओबीसींचा उठाव करण्याची गरज नव्हती, पहा मंत्री...

मोठी बातमी ! छगन भुजबळांना ओबीसींचा उठाव करण्याची गरज नव्हती, पहा मंत्री विखेंचा घणाघात

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : 
आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो एल्गार सुरु आहे त्यावर आता राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करत ओबीसींचे आंदोलन, उठाव करण्याची गरज नव्हती, असे मंत्री विखे यांनी म्हटलंय.

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सध्या महाराष्ट्राभर सभा घेत मागणीला धार लावली आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते आरक्षणाला विरोध करताना दिसतायेत. यातच आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणाची धार वाढत चालली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जी आरक्षणविषयी मागणी केलीये त्या मागणीला सरकारची संमती आहे. परंतु जर शासनाने दोन जानेवारीपर्यंत मुदत घेतली, वेळ मागितला आहे तर जरांगे पाटील यांनीही संयम ठेवायला हवा. त्यांनी सरकारला वेळ दिला आहे त्यामुळे शासन योग्य निर्णय घेईलच.

त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांनी जो ओबीसींचा उठाव केला त्याची आवश्यकता नव्हती असं मला वाटत. सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली असती, तर हा उठाव करणं एकदम योग्य होत पण जर कुणी आरक्षण मागत असेल म्हणून त्याला विरोध करणं व करण्यासाठी ओबीसींचे आंदोलन उभे करणे हे योग्य नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...

बापरे! महापालिकेत ६० कोटींचा भ्रष्टाचार? ‘कोणी आणि का केली मागणी?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या...

खा. नीलेश लंके यांना भाजपची ‘मोलाची साथ’; राणीताई लंके यांचा विधानसभेचा मार्ग सुकर होणार

पारनेरला राज्य शासनाचा कोट्यवधींचा निधी | आ. टिळेकर धावले मदतीला | राणीताई लंके यांचा...