spot_img
महाराष्ट्रब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल

ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल

spot_img

मुंबई / नगर सहयाद्री : कुर्ल्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. सध्या ते वैद्यकीय कारणास्तव कारागृहातून बाहेर आहेत.

शनिवारी दुपारी नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांना कुर्ला येथील रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची टीम प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ते रुग्णालयात आले होते. मलिक यांच्यावर कुर्ला येथील क्रिटीकेअर सेंटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ईडीने केली अटक, सध्या वैद्यकीय जामिनावर
नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित प्रकरणात नवाब मलिक यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भात ईडीकडून त्यांची चौकशी सुरु होती. या कारणात त्यांच्यावर ईडीने अटक करण्याची कारवाई केली. अटक केल्यानंतर अनेक दिवस ते तुरुंगात होते. काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणामुळे त्यांना जामीन मिळाला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी; कारणही सांगितलं

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी...

आरोपी रिक्षाने आले, वाट पहिली अन् थेट फायरिंग;…वाचा नेमकं काय घडलं

मुंबई / नगर सह्याद्री - अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री...

सलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथे...