spot_img
अहमदनगरअहमदनगरसह शिर्डी पण भाजपा जिंकणार! मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

अहमदनगरसह शिर्डी पण भाजपा जिंकणार! मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

spot_img

लोणी | नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती साध्य केली आहे. आता पुन्हा एकदा देशाला विकसीत राष्ट्र बनविण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना आपल्याला विजयी करायचे आहे. देशातील चारशे जागा जिंकताना नगर जिल्ह्यातील दोन जागांचाही समावेश यामध्ये राहील असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यत केला.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी आज दाढ बुद्रूक, दुर्गापुर, हसनापूर, या गावांमध्ये मतदारांशी संवाद साधला. विविध ठिकाणी झालेल्या बैठकांमधून ना. विखे पाटील यांनी केंद्र सरकारने मागील दहा वर्षात घेतलेल्या निर्णयांची माहीती देवून विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेल्या वाटचालीचा आढावा घेतला.सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास या मंत्राने नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात योजनांवर काम सुरु केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून त्यांनी सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले काम हे देशातील जनतेला सामाजिक न्याय देणारे ठरले आहे. यापुर्वी काँग्रेसचेही सरकार देशात आणि राज्यात होते. परंतू त्यांनी कधीही सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत.आज भारत देश औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र म्हणून, जगामध्ये ओळखले जात आहे. केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आली आहे.

येणा-या काळात तीस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश म्हणून भारत देश ओळखला जाईल असे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज भारत देश काम करीत आहे. आघाडी सरकारचे अडीच वर्षे आणि महायुती सरकारकारचे दिड वर्षे याची तुलना आता मतदारांनी करायची आहे. एक रुपयात पीक विमा योजनेपासून ते आनंदाचा शिधा असे महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत.लखपती दिदि योजनेतून बचत गटानांही मोठा लाभ होणारआहे. दूध उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर ४० कोटी ९३ लाख रुपयांचे अनुदान जिल्ह्यातील २ लाख ६५ हजार शेतक-यांच्या खात्यात जमा झाले असल्याची माहीतीही त्यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांची निर्मिती करणार : डॉ. सुजय विखे पाटील यांचा विश्वास

श्रीगोंदा । नगर सह्याद्री - अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असून नैसर्गिक साधन...

अबब…! पारनेर ग्रामीण रुग्णालयात दगावले कोवीडचे ९७ रुग्ण; भाळवणीच्या ‘त्या’ कोवीड सेंटरमध्ये हेराफेरी!

माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचा गंभीर आरोप | ग्रामीण रुग्णालय म्हणते, हा आकडा भाळवणीचा!...

Parner crime : पारनेरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, दोन मंदिरातील दानपेटी पळविल्या, चोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद…

पारनेर ‌/ नगर सह्याद्री - Parner crime : तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील खंडोबा मंदिरात चोरीची...

Ahmednagar crime : अखेर घरफोडी करणार्या दोघांना ठोकल्या बेड्या, सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कर्जत । नगर सहयाद्री- Ahmednagar crime : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...