spot_img
महाराष्ट्रउच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ५० वकील मनोज जरांगे यांच्या भेटीला ! पहा...

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ५० वकील मनोज जरांगे यांच्या भेटीला ! पहा नेमके काय घडले

spot_img

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभेबाबत अनेक सूचक वक्तव्ये केली आहेत. लोकसभेला मराठा उमेदवार उभे करण्याबाबत त्यांनी सूतोवाच केले होते.

आता लोकसभा निवडणुकीत राजकीय धडा गिरविण्याची संधी या आंदोलकांना आली आहे. समाजाने प्रत्येक लोकसभा मतदार संघात जास्तीत जास्त उमेदवार देण्याची मागणी होत आहे. उद्या 30 मार्च रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे याविषयीचा निर्णय जाहीर करतील. पण त्यापूर्वी मराठवाड्यातील वकिलांनी त्यांन सबुरीचा सल्ला दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी जरागे यांना केले. कोणत्याही पक्षाशी बांधिलकी न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही पक्षाशी युती करून निवडणुका लढण्यापासून या वकिलांनी जरांगे यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

अपक्ष उमेदवार उभे केल्यास, पक्षाशी युती करून निवडणूक लढल्यास आरक्षणाचा मूळ उद्देश बाजूला राहिल. आरक्षण आंदोलनाचे मोठे नुकसान होईल. या निर्णयामुळे समाज बांधवांमध्ये एक प्रकारची संभ्रमाची अवस्था निर्माण होऊन आरक्षण आंदोलनालाच यामुळे खीळ बसण्याची भीती वकिलांनी व्यक्त केली. अपक्ष उमेदवार उभे केल्यास मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये अधिक तीव्र ध्रुवीकरण होऊन समाजविघातक शक्ती त्याचा अधिक फायदा उचलतील, याकडेही वकिलांनी लक्ष वेधले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथे...

आता माघार नाहीच; उलथापालथ करावीच लागेल! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर...