spot_img
अहमदनगरPolitics News: 'कमळा' च्या बागेत 'अशोका' चे झाड!! प्रवेशानंतर भाजपाच्या समिकरणात 'मोठे'...

Politics News: ‘कमळा’ च्या बागेत ‘अशोका’ चे झाड!! प्रवेशानंतर भाजपाच्या समिकरणात ‘मोठे’ बदल, वाचा सविस्तर

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
आगामी राज्यसभा निवडणुकीत तीनच उमेदवार उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतल्याने महाराष्ट्रातील सहा जागांवरील निवडणूक बिनविरोध होण्याची शयता होती. परंतु अशोक चव्हाण (Ashok Chavan)यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ होताना दिसत आहे. चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर राज्यसभा निवडणुकीत भाजप तीनऐवजी चार जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजप आगामी राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून चौथा उमेदवार देण्याची शयता वर्तवली जात आहे. मतांच्या कोट्यानुसार भाजपला तीन जागा सहज जिंकता येणार आहेत. चौथ्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. याशिवाय अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागा जिंकता येणार आहे. भाजपला तीन, अजितदादांना एक आणि एकनाथ शिंदे यांना एक, अशा पाच जागा जिंकल्यानंतर उरलेल्या मतांतून सहाव्या जागेची बेगमी करावी लागणार आहे. याशिवाय अशोक चव्हाण आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या रुपाने भाजपला मोठी लॉटरी लागली आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील २८८ पैकी चार जागा रिक्त असल्यामुळे आमदारांची संख्या २८४ आहे. काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला, तर सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे. भाजप आमदार गोवर्धन शर्मा आणि शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. त्यामुळे आमदारांची संख्या चारने घटून २८४ इतकी झाली आहे. राज्यसभेवरील एका जागेसाठी मतांचा कोटा ४० आहे. काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ ४५ होते. परंतु अशोक चव्हाण आणि सुनील केदार यांच्यानंतर ते ४३ वर गेले आहे. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमधील ३ आमदार चव्हाणांच्या बाजूने राहण्याची शयता आहे. याशिवाय राज्यभरातील १२ ते १४ आमदार अशोक चव्हाण समर्थक असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे काँग्रेसची समीकरणे बिघडण्याची भीती आहे.

राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यास अपात्रतेची शयता असते. त्यामुळे निवडणुकीला गैरहजर राहून अप्रत्यक्षरित्या अशोक चव्हाण समर्थक आमदार पडद्यामागची मदत करण्याची शयता आहे. अर्थात काँग्रेसच्या पाठीशी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या समर्थक आमदारांची ताकद आहे. परंतु मतांची जुळवाजुळव करताना नाकी नऊ येऊन काँग्रेसवर निवडणुकीपर्यंत टांगती तलवार राहण्याची शयता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...