spot_img
अहमदनगरAhmednagar: पाणी पुरवठा खंडित होणार? पाटबंधारे विभागाचा 'मनपाला' इशारा

Ahmednagar: पाणी पुरवठा खंडित होणार? पाटबंधारे विभागाचा ‘मनपाला’ इशारा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
महापालिका प्रशासनाने कॅलिब्रेशन करून जल मापक यंत्र न बसवल्याने मुळा पाटबंधारे विभागाकडून दुप्पट दराने पाणीपट्टी आकारली जात आहे. या पाणीपट्टीचे एप्रिलपासून ऑटोबरपर्यंत बिलाचे ६.९७ कोटी रुपये महापालिकेने थकवल्याने कोणत्याही क्षणी पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा मुळा धरण शाखाधिकार्‍यांनी दिला आहे.

महाराष्ट्र जलसंपती नियमन प्राधिकरण अधिनियम अन्वये बिगर सिंचन ग्राहकांनी नोंदणीकृत संस्थेकडून कॅलिब्रेशन करून जल मापक यंत्र बसविणे आवश्यक आहे. मुळा शाखा कार्यालयाने महापालिकेला जलमापक यंत्राचे नोंदणीकृत संस्थेकडून कॅलिब्रेशन करण्याबाबत वारंवार कळविले. अद्याप महापालिकेने तसे प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे मनपाला दुप्पट दराने आकारणी होत आहे. तसेच, सद्यस्थितीत मुळानगर येथील पंपगृहात तीन पैकी एक जलमापक बंद असल्याचे पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, ऑटोबर अखेर मनपाकडे ६ कोटी ९७ लाख ५० हजार २१९ रुपये बिगर सिंचन पाणीपट्टी थकीत आहे. मनपा प्रशासनाने १८ लाख ९७ हजार ८८ रुपये डिसेंबर महिन्यात भरले आहेत. सर्व जल मापकांचे नोंदणीकृत संस्थेकडून कॅलिब्रेशन करून प्रमाणपत्र सादर करावे. तसेच, उर्वरित पाणीपट्टी त्वरित भरावी, अन्यथा पाणी पुरवठा कुठल्याही क्षणी खंडित करण्यात येईल, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या आठ दिवसात राजकीय स्फोट होणार’, चर्चांना उधाण

यवतमाळ / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून विविध घडामोडी घडतायेत. नुकतेच...

Politics News : अशोक चव्हाणांनी केला आणखी एक भूकंप ! ‘त्या’ ५५ बड्या नेत्यांनी काँग्रेसला ठोकला रामराम

नांदेड / नगर सह्याद्री : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येत काँग्रेसला...

‘मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमांतून सव्वा दोन कोटींची विकासकामे’

सचिन वराळ पाटील यांची माहिती निघोज। नगर सहयाद्री- निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये...

मराठा आंदोलनाचा थरार ! समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न, तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक

जालना / नगर सह्याद्री : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण...